बिहारनंतर मध्य प्रदेशमध्येही भाजपला उत्तर देण्यासाठी राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या (आरएसएस) धर्तीवर काँग्रेसने राष्ट्रीय काँग्रेस स्वयंसेवक संघ (आरसीएसएस) बनवण्याची घोषणा केली आहे. काँग्रेसच्या विचारधारेशी निगडीत असलेल्या लोकांनाच आरसीएसएसशी जोडण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते.
माजी आंतरराष्ट्रीय हॉकीपटू आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असलम शेर खान यांनी बुधवारी माध्यमांशी बोलताना याची माहिती दिली. ते म्हणाले, संपूर्ण देशभरात आरएसएसने आपला विस्तार केला आहे. ते भाजपसाठी काम करतात. पण आमचा संघ हा (आरसीएसएस) हा धर्मनिरपेक्ष लोकांचा संघ असेल.
उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीत भाजपच्या विजयाचा उल्लेख करताना ते म्हणाले, उत्तर प्रदेशमध्ये धर्मनिरपेक्ष राजकारण संपुष्टात आले आहे. ते लक्षात घेऊन हा संघ तयार करण्यात येणार आहे. आरएसएस ज्यापद्धतीने भाजपसाठी काम करते त्याच धर्तीवर हा संघ धर्मनिरपेक्ष विचारधारा वाढवण्यासाठी काम करेल, असेही ते म्हणाले.
देशातील धर्मनिरपेक्ष राजकारण संपुष्टात आणण्याचे काम उत्तर प्रदेशमध्ये झाले आहे. त्यासाठी नव्या युगाची सुरूवात करणे आवश्यक होती. या संघात काम करू इच्छिणाऱ्यांना फक्त धर्मनिरपेक्ष विचारधारा अर्थात काँग्रेसची विचारधारा मानणे गरजेचे आहे. ते जेथे आहेत (शिक्षक, डॉक्टर, नोकरी, व्यवसाय आदी) तेथे राहूनच या विचारधारेसाठी काम करू शकतात.
आरसीएसएसबाबत आपण पक्षाच्या हायकमांडशी चर्चा केली नसल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. परंतु, आपल्या निर्णयावर हायकमांड खूश होतील, असा विश्वास व्यक्त केला. सध्या या संघाचे कार्यक्षेत्र हे मध्य प्रदेश आणि छत्तीसगड असेल. आरएसएसने देशात मोठ्याप्रमाणात बदल घडवण्याचे काम केल्याचे खान यांनी मान्य केले. आरसीएसएसही त्या पद्धतीनेच काम करेल व आपले काम हे देशहिताचेच असेल, हे सांगण्यास ते विसरले नाहीत.
खासन हे माजी आंतरराष्ट्रीय हॉकीपटू आहेत. १९७५ मध्ये कौलालम्पूरमध्ये झालेल्या विश्वचषक पटकावलेल्या भारतीय संघाचे ते सदस्य होते. त्याचबरोबर १९७२ मधील म्युनिच ऑलिम्पिकमध्येही त्यांनी आपला सहभाग नोंदवला होता.
दरम्यान, बिहारचे आरोग्य मंत्री तेजप्रताप यादव यांनीही आरएसएसच्या धर्तीवर बिहारमध्ये धर्मनिरपेक्ष सेवक संघाची (डीएसएस) उभारणी केली आहे. तेजप्रताप हे राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांचे चिरंजिव आहेत. तेजप्रताप यांनी मंगळवारी आपल्या नव्या संघटनेची घोषणा केली आणि राष्ट्रीय स्तरावर आपला डीएसएस विस्तारणार असल्याचे ते म्हणाले.

BJP Politics in Tamil Nadu blending caste and faith
तमिळनाडूमध्ये जात व धर्माची मोट बांधण्याचा भाजपाचा प्रयत्न! काय आहे परिस्थिती?
owaisi apana dal pdm
अखिलेश यांच्या ‘पीडीए’ सूत्राला ओवेसींचे ‘पीडीएम’ देणार टक्कर? उत्तर प्रदेशात तिसरी आघाडी
NCP clock symbol
अरुणाचल प्रदेशसह लक्षद्वीपमध्ये राष्ट्रवादीला घड्याळ चिन्ह मिळणार, राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांचा दावा
Chandrapur Lok Sabha
चंद्रपुरात काँग्रेसमध्ये उघड तर भाजपमध्ये छुपी गटबाजी