राज्यसभेत दीर्घकाळ गैरहजर राहिल्याबाबत वादाच्या भोवऱयात सापडलेल्या खासदार सचिन तेंडुलकरला आता अधिवेशनाच्या उर्वरित काळासाठीही आणखी रजा मंजूर करण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून खासदार सचिन आणि रेखा यांच्या राज्यसभेतील दीर्घकाळ अनुपस्थितीचा विषय चांगलाच तापलेला आहे. सचिन अर्थसंकल्पीय अधिवेशनातही गैरहजर राहिला होता. यामुळे सचिनला दिलेली खासदारकी काढून घ्यावी अशी मागणी राज्यसभा सदस्यांनी लावून धरली आहे.
त्यात सचिनने कौंटुंबिक कारण देत उर्वरित अधिवेशनालाही गैरहजर राहण्याची परवानगी मागितली. सचिनची मागणी राज्यसभा उपाध्यक्ष पी.जे.कुरीयन यांनी मंजूर केली आहे. यावर राज्यसभा सदस्यांनी जोरदार आक्षेप नोंदविला. खासदार नरेश अग्रवाल यांनी सचिन संसद भवनाच्या बाजूलाच असलेल्या विज्ञान भवनातील कार्यक्रमाला हजर राहू शकतात पण, संसदेच्या अधिवेशनाला ते हजर राहू शकत नाहीत अशी टीका केली आहे.