बांगलादेशमध्ये सौदी अरेबियाच्या मदतीने ५०० हून अधिक मशिदी उभारल्या जाणार आहेत. या मशिदींच्या निर्मितीसाठी १०० कोटी रूपयांची गुंतवणूक केली जाणार असल्याचे सांगण्यात येते. बांगलादेशच्या एका अधिकाऱ्यानेही याला पुष्टी दिली आहे. मशिदींच्या माध्यमातून इस्लामिक कट्टरतावादाला प्रोत्साहन मिळू शकते, अशी भीती येथील अल्पसंख्याक समाजाला वाटत आहे

सरकारने प्रत्येक भागात एका मशिदीचा प्रस्ताव ठेवला आहे. एकूण ५६० मशिदी बनवण्याची योजना आहे. मुस्लिम समाजाला खूश करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचे सांगण्यात येते.
पंतप्रधान शेख हसिना यांनी सौदी अरेबियाकडून यासाठी निधी मिळाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. या मशिदींच्या निर्मितीसाठी १०० कोटी रूपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. मागील वर्षी पंतप्रधानांनी पेट्रोलियम पदार्थांसाठी अनेक देशांचा दौरा केला होता. त्यानंतर या दोन्ही देशांमध्ये सहकार्यासाठी सहमती बनली, असे बांगलादेश सरकारमधील मंत्री मुस्तफा कमाल यांनी माध्यमांना दिली.

जगात कट्टरतावादाला सौदी अरेबियाकडून प्रोत्साहन दिले जाते, असा वारंवार आरोप केला जातो. बांगलादेशमध्ये तयार करण्यात येत असलेल्या मशिदींमुळे मात्र अल्पसंख्यांक समाजामध्ये भीतीचे वातावरण आहे.