वैज्ञानिकांनी जगातील सर्वात लहान तापमापक तयार केला असून, तो मानवी केसापेक्षा वीस हजार पटींनी लहान आहे. डीएनएच्या रचनांचा वापर करून तो तयार केला आहे. विशिष्ट तापमानाला घडी घातल्या जाणाऱ्या तर विशिष्ट तापमानाला उलगडत जाणाऱ्या जनुकांचा वापर त्यात केला आहे. नसíगक व मानवनिर्मित नॅनो तंत्रज्ञानाचा वापर यात करण्यात आला आहे. साठ वर्षांपूर्वी लागलेल्या एका शोधानुसार डीएनएचे रेणू आपली माहिती सांकेतिक भाषेत ठेवत असतात, पण उष्णता मिळाल्यावर ही माहिती उघड होते. कॅनडातील मॉन्ट्रियल विद्यापीठाचे प्राध्यापक अलेक्सिस बेलिस्ले यांनी सांगितले, की अलीकडील काही वर्षांत जैवरसायनशास्त्रज्ञांनी जैवरेणू म्हणजे प्रथिने किंवा आरएनए (डीएनएसारखाच एक रेणू) यांचा वापर नॅनो तापमापक म्हणून केला आहे. डीएनएचे उलगडणे व गुंडाळणे यांचा वापर करून त्यात तापमान मोजले जाते. या नसíगक तापमापकांवरून प्रेरणा घेऊन डीएनए तापमापक तयार केले आहेत. ते मानवी केसापेक्षा २० हजार पट लहान आहेत व आम्ही अशा डीएनए रचना तयार केल्या आहेत, ज्या विशिष्ट तापमानाला उकलतात व तापमान मोजले जाते. याचा महत्त्वाचा फायदा असा, की डीएनएचा वापर करून रेणवीय तापमापक तयार केले आहेत. त्यात डीएनएच्या रासायनिक गुणांचा वापर केला आहे. डीएनए हा चार वेगवेगळय़ा रेणूंचा बनलेला असतो. त्यात न्युक्लिओटाईड ए हा न्युक्लिओटाईड टी या रेणूशी कमकुवत बंधाने जोडलेला असतो, तर न्युक्लियोटाईड सी हा न्युक्लिओटाईड जी बरोबर जास्त घट्ट बांधलेला असतो असे मॉन्ट्रियल विद्यापीठाचे डेव्हिड गॅरो यांचे मत आहे. या साधारण रचनांचा उपयोग करून काही डीएनए रचना अशा तयार केल्या ज्या विशिष्ट तापमानाला गुंडाळल्या किंवा उलगडल्या जातील. डीएनए रचनांना प्रकाशीय संवेदक जोडले जातात व त्यामुळे ५ नॅनोमीटर आकाराचे तापमापक तयार करणे शक्य होते, असे मॉन्ट्रियल विद्यापीठाचे अमाद डेसोरियर्स यांनी सांगितले. हे नॅनो तापमापक म्हणजे नॅनो तंत्रज्ञानाची नवीन शाखा ठरणार आहेत व त्यामुळे रेणवीय जीवशास्त्राचे नवे आकलन होणार आहे. अजूनही यात अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत हे व्हॅली बेलिस्ले यांनी मान्य केले. मानवी शरीराचे तापमान हे ३७ अंश सेल्सियस असते, पण प्रत्येक पेशीत अगदी सूक्ष्मस्तरावर तापमानात फरक होत असतात असे त्यांनी सांगितले. नॅनो मशिन्स व नॅनो मोटर्स यांची निसर्गाने खूप आधीपासून निर्मिती केली आहे. त्यात आता लाखो वष्रे उलटली असून, या जैविक तंत्रात प्रगती झाली आहे. कालांतराने हे नॅनो तापमापक आपल्याला इलेक्ट्रॉनिक उपकरणात दिसू शकतील. अगदी सूक्ष्म स्तरावरील तापमानाची नोंद यात घेतली जाईल. नॅनो लेटर्स या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.