जम्मू आणि काश्मीरमध्ये लष्कराचे जवान आणि पोलिसांमध्ये हाणामारी झाल्याचे वृत्त आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लष्कराच्या जवानांनी गांदरबल जिल्ह्यातील एका पोलीस ठाण्यात घुसून सहा पोलीस कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण केली. मारहाणीत ते जखमी झाले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तपासणी नाक्याच्या विषयावरून जवान आणि पोलिसांमध्ये वाद झाला. त्याचे पर्यावसन मारहाणीत झाले, असे सांगण्यात येत आहे. जखमींमध्ये एका पोलीस अधिकाऱ्याचाही समावेश आहे. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे.

 

तपासणी नाक्याच्या मुद्द्यावरून पोलीस आणि लष्कराच्या जवानांमध्ये वाद झाला. यानंतर लष्कराचे जवान गांदरबल येथील पोलीस ठाण्यात आले. तेथे असलेल्या पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांशी सुरुवातीला बाचाबाची झाली. त्याचे पर्यावसन हाणामारीत झाले. लष्कराच्या जवानांनी पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीत सहा पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. त्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. एक पोलीस अधिकारी गंभीर जखमी झाला आहे. त्याच्या डोक्याला मार लागला आहे. या प्रकरणी पोलिसांनी लष्कराच्या जवानांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.