ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि शिक्षणतज्ज्ञ प्रा. यशपाल यांचे वयाच्या ९० व्या वर्षी निधन झाले. विज्ञानातील कठीण गोष्टी सर्वसामान्यांना सोप्या पद्धतीने समजावून सांगण्यात त्यांचा हातखंडा होता. शास्त्रज्ञ व शिक्षणतज्ज्ञ म्हणून त्यांची कामगिरी उल्लेखनीय होती. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना सरकारने पद्मविभूषण, पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले होते.

यशपाल यांनी पंजाब विद्यापीठातून १९४९ मध्ये भौतिकशास्त्रात पदवी मिळवली. त्यानंतर १९५८ मध्ये मॅसेच्यूसेट्स इन्सिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथून भौतिकशास्त्रातच पीएच.डीही मिळवली होती. वैज्ञानिक तथ्ये आणि त्यांची प्रक्रिया सोप्या शब्दांत त्यांनी मांडल्या. त्यांनी अनेक प्रतिष्ठित वैज्ञानिक संस्थांमध्ये कार्य केले. विज्ञानातील त्यांच्या कार्याची दखल घेऊन सरकारने त्यांना १९७६ मध्ये पद्मभूषण तर २०१३ मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केले होते.  केंद्र सरकारने स्थापन केलेल्या विज्ञानविषयक अनेक समित्यांचे त्यांनी सदस्य व सल्लागार म्हणून काम पाहिले.

Lata Mangeshkar Award 2024 announced for amitabh bachchan
अमिताभ बच्चन यांना यंदाचा लता मंगेशकर पुरस्कार घोषित; ए.आर. रेहमान, अशोक सराफ, अतुल परचुरे यांना देखील विशेष पुरस्काराने गौरवणार
Prof. Rupesh Mahadik
ठाणे महाविद्यालयाचे प्राध्यापक रुपेश महाडीक यांचा आदर्श अध्यापक पुरस्काराने सन्मान
loksatta tarun tejankit award
‘तरुण तेजांकितां’वर पुनर्झोत!
chandrachud
‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ सोहळा; सरन्यायाधीश चंद्रचूड प्रमुख अतिथि, विविध क्षेत्रांतील १८ प्रज्ञावंतांचा सन्मान

प्रा. यशपाल हे दूरदर्शनवरील लोकप्रिय ‘टर्निंग पाँईंट’ या विज्ञान मालिकेत ते ‘विज्ञान गुरू’ च्या भूमिकेत होते. या माध्यमातून ते विज्ञान आणि निसर्गातील अनेक रहस्यांची उकल ते रंजक पद्धतीने करत.