मुंबई शेअर बाजारात मोठी घसरण झाली आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ५०० हून अधिक अंशांनी खाली घसरला आहे. तर निफ्टीच्या निर्देशांकातही मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. भारतीय सैन्याकडून पाकिस्तानी दहशतवादी तळांवर हल्ले केल्याची माहिती संरक्षण मंत्रालयाने दिल्यानंतर मुंबई शेअर बाजार आणि निफ्टीच्या निर्देशाकांमध्ये घसरण झाली आहे. उरीतील हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय सैन्याने बुधवारी रात्री पाकिस्तानी दहशतवादी तळांवर हल्ला चढवला. त्याचे पडसाद शेअर बाजारात दिसून येत आहेत.

मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात ५०० हून अधिक अंकांची घसरण झाली आहे. तर निफ्टीच्या निर्देशांकादेखील खाली आला आहे. गुरुवारी दुपारी १२.३६ वाजता मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ५३१.०९ अंकांच्या घसरणीसह २७,७६१.७२ इतका होता. तर निफ्टीचा निर्देशांक ९६.५५ अंकांच्या घसरणीसह ८,४६८.६० इतका होता.

दुपारी १२.१७ वाजता मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक २८,२९० इतका होता. तर निफ्टीचा निर्देशांक ८,७५१ इतका होता. मात्र त्यानंतर भारतीय संरक्षण मंत्रालयाकडून उरीतील हल्ल्याचा बदला म्हणून पाकिस्तानी दहशतवादी तळांवर सर्जिकल स्ट्राईक केल्याची माहिती देण्यात आली. यानंतर मुंबई शेअर बाजार आणि निफ्टीमध्ये घसरण पाहायला मिळाली.