22 August 2017

News Flash

अयोध्येतील ‘त्या’ जागेवर राम मंदिर बांधा- शिया वक्फ बोर्ड

वक्फ बोर्डाकडून सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: August 8, 2017 4:17 PM

संग्रहित छायाचित्र

वादग्रस्त बाबरी मशीद प्रकरणी शिया वक्फ बोर्डाने सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. बाबरी मशिदीच्या वादग्रस्त जागेवर राम मंदिराची उभारणी केली जाऊ शकते, असे शिया वक्फ बोर्डाने प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे. याशिवाय राम मंदिरापासून एका विशिष्ट अंतरावर मुस्लिमबहुल भागात मशिदीची उभारणी केली जावी, असेदेखील या प्रतिज्ञापत्रात शिया वक्फ बोर्डाने म्हटले आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला रामजन्मभूमी आणि बाबरी मशिदीचा मुद्दा निकालात निघण्याची शक्यता आहे.

शिया वक्फ बोर्डाने अयोध्येतील वादग्रस्त जागेवर राम मंदिर उभारले जावे, असे म्हटले आहे. या मंदिरापासून विशिष्ट अंतरावर मशीद उभारली जावी, असेदेखील बोर्डाने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे. ‘बाबरी मशीद शिया वक्फ बोर्डाची होती. त्यामुळे या प्रकरणात इतर पक्षकारांसोबत बातचीत करण्याचा अधिकार बोर्डाकडे आहे. संवादाच्या माध्यमातून शांततापूर्ण पद्धतीने समाधानकारक तोडगा काढण्याचा अधिकार केवळ वक्फ बोर्डाकडे आहे,’ असा उल्लेख प्रतिज्ञापत्रात करण्यात आला आहे.

‘राम मंदिर आणि बाबरी मशिदीची उभारणी झाल्यास अनेक वर्षांपासून सुरु असलेला वाद संपुष्टात येईल. यासोबतच मंदिर आणि मशिदीच्या उभारणीमुळे दररोज यावरुन सुरु असलेले वाददेखील संपुष्टात येतील. यामुळे वारंवार अशांतता निर्माण करणारे प्रसंग उद्भवणार नाहीत,’ असेदेखील शिया वक्फ बोर्डाने सर्वोच्च न्यायालयाला प्रतिज्ञापत्राच्या माध्यमातून सांगितले. अयोध्या प्रकरणात अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालावर दाखल करण्यात आलेल्या याचिकांवरील सुनावणीसाठी त्रिसदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. न्यायमूर्ती दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील समिती ११ ऑगस्टपासून याचिकांवरील सुनावणीला सुरुवात करणार आहे.

First Published on August 8, 2017 3:38 pm

Web Title: shia waqf board files affidavit in supreme court in babri masjid and ram mandir issue
 1. S
  Shrikant Yashavant Mahajan
  Aug 9, 2017 at 9:33 am
  खरोखरच हे मान्य झाले तर भाजपचे व कोंग्रेसचे दुकाने बंद होतील व विकासाच्या गोष्टींसाठी वेळ मिळेल
  Reply
 2. P
  paritosh
  Aug 9, 2017 at 1:08 am
  अतिशय मूर्खपणाचा निर्णय आहे. केवळ मंदिर बांधायला हो म्हटल्याने हे शांत बसणार आहेत का? उलट, दुसरा मुद्दा बाहेर काढून हिंदू राष्ट्र निर्मितीची आग भडकावणं चालूच ठेवतील. पुरोगामी जगाच्या समानतेच्या तत्वावर यांचा विश्वास नाही कारण यांच्या मनाला खाणारा कमीपणा. अमेरिका, चीन, युरोप यांना टक्कर देण्याची यांची लायकी नाही. त्यामुळे हे अधोगामी अरब राष्ट्रांप्रमाणेच भारतालाही नेहमी धर्मयुद्धाच्या उंबरठ्यावर ठेवत आले आहेत. ज्या दिवशी राम मंदिर बनवायचा मार्ग सुकर होईल त्याच दिवशी हे पुढच्या धर्मयुद्धाची ठिणगी पाडल्याशिवाय राहणार नाहीत.
  Reply
 3. T
  Tatyasaheb Khandekar
  Aug 8, 2017 at 9:15 pm
  अतिशय चांगला निर्णय घेतला असुन, वक्फ बोर्डाचे अभिनंदन. पण मुस्लिम बहुल भागामध्ये सुद्धा मशिदीचे काम तितक्याच गतीने व्हावे जेवढे राम मंदिर उभारले जाईल. दोन्ही मंदिरांचा शुभारंभ एकाच वेळी करून शांतता, समानता आणि राष्ट्रीय ऐक्याचे दर्शन जगाला घडावे हीच सर्व भारतीयांची अपेक्षा असेल.
  Reply
 4. A
  Avinash A Sonwane
  Aug 8, 2017 at 8:40 pm
  देशात शांतता नांदायला हरकत नाही आता
  Reply
 5. M
  Mehboob
  Aug 8, 2017 at 8:27 pm
  जय हिंद, प्रस्ताव एकदम बरोबर आहे ? मंदिर बनलं तर राजकारणीय पोळी कुठे भाजतील ?
  Reply
 6. S
  Shivram Vaidya
  Aug 8, 2017 at 6:34 pm
  शिया वक्फ़ बोर्डाचे हार्दिक अभिनंदन ! मात्र त्यांचा हा प्रस्ताव बघून ढोंगी धर्मनिरपेक्षतावादी, पुरस्कारवापसी टोळी, देशातील तथाकथित बुद्धीवादी, ढोंगी पत्रकार, स्तंभलेखक, साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष यांचा पोटशूळ उठेल. कारण देशामध्ये जर हिंदू-मुस्लिम एकी झाली तर वर उल्लेख केलेल्या दलालांची स्युडो सेक्युलॅरिझमची दुकाने बंद होतील.
  Reply
 7. M
  milind
  Aug 8, 2017 at 5:26 pm
  स्वागत आहे.
  Reply
 8. V
  Vijay
  Aug 8, 2017 at 5:23 pm
  तडीपार अमित शाह आणि संघी वक्फ बोर्ड वाल्यांच्या घरी जाऊन पोहोचले वाटत
  Reply
 9. सांज
  Aug 8, 2017 at 5:13 pm
  Good decision by Muslim Board.
  Reply
 10. P
  prashant
  Aug 8, 2017 at 4:31 pm
  योग्य उपाय आहे .
  Reply
 11. S
  Shriram Bapat
  Aug 8, 2017 at 4:27 pm
  अत्यंत स्वागतार्ह निर्णय. हिंदू-मुस्लिमांमधील कलहाचे एक मोठे कारण यामुळे नाहीसे होईल. अन्य मुस्लिम संस्थांनी यात कोणताही मोडता घालू नये. तसेच काहीतरी कारणाने दोन्ही धर्मियात दंगा व्हावा असे इच्छिणाऱ्या हिंदू आणि मुस्लिमांनी आपली दुकाने बंद करावी.
  Reply
 12. Load More Comments