शांततेचा पुरस्कर्ता हरपला; जगभरातून आक्रोष

इस्त्रायलचे माजी अध्यक्ष व पॅलेस्टाइनसोबतच्या संघर्षांला पूर्णविराम देण्यासाठी अथक प्रयत्न केल्याने शांततेच्या नोबेल पुरस्काराचे मानकरी ठरलेले शिमॉन पेरेझ यांचे बुधवारी निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाबद्दल भारतासह जगभरातून शोक व्यक्त करण्यात येत आहे.

Narendra Modi, Karad, public meeting,
नरेंद्र मोदींची कराडमध्ये ३० एप्रिलला जाहीर सभा, उदयनराजेंच्या प्रचारार्थ आयोजन
PM Modi Ramtek Sabha
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर निशाणा; म्हणाले, “इंडिया आघाडीला त्यांच्या पापाची शिक्षा…”
Mira-Bhainder NCP district president Mohan Patil arrested
राष्ट्रवादी मिरा-भाईंदर जिल्हाध्यक्ष मोहन पाटील यांना अटक, शैक्षणिक संस्थेत घोटाळा केल्याचा आरोप
Loksatta anvyarth Two parties join India from Jammu and Kashmir to fight against BJP Farooq Abdullah National Conference Mehbooba Mufti PDP
अन्वयार्थ: भाजपेतर ‘इंडिया’तील घटकपक्षांच्या टवाळक्या

१३ सप्टेंबरला शिमॉन पेरेझ यांच्या मेंदूतून रक्तस्त्राव झाल्यानंतर त्यांची प्रकृती ढासळली. त्यानंतर त्यांना तेल हाशोमर येथील शेबा वैद्यकीय केंद्रात दाखल करण्यात आले. मंगळवारी अनेक अवयवांनी त्यांची साथ सोडली. अखेर बुधवारी पहाटे तीनच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.

शिमॉन यांचे पूत्र शेमी यांनी त्यांच्या निधनाची बातमी जाहीर केली. शिमॉन यांचे निधन झाले असून, त्यांचे विचार इस्त्रायलसाठी नेहमीच मार्गदर्शक ठरतील, असे शेमी म्हणाले. शुक्रवारी पेरेझ यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

इस्त्रायलचे दोनदा पंतप्रधान बनलेल्या आणि अध्यक्षपद भूषविलेल्या शिमॉन पेरेझ यांनी पॅलेस्टाइनसोबतचा संघर्ष मिटविण्यासाठी अथक प्रयत्न केले. ओस्लो करारासाठी शिमॉन यांच्याबरोबरच तत्कालीन पंतप्रधान यित्झक राबीन आणि पॅलेस्टाइनचे यासर अराफत यांना शांततेचा नोबेल पुरस्कार मिळाला होता. जवळपास सात दशकांच्या राजकीय कारकिर्दीत शिमॉन यांनी परराष्ट्रमंत्री, अर्थमंत्र्यांसह सर्व वरिष्ठ पदांवर आपल्या कामाचा ठसा उमटवला.

शिमॉन पेरेझ यांच्या निधनाबद्दल भारतातील नेत्यांसह जगभरातील नेत्यांनी शोक व्यक्त केला. त्यांच्यावर शुक्रवारी अंत्यसंस्कार होणार असून, त्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्यासह जगभरातील अनेक नेते उपस्थित राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

भारताचे खंदे समर्थक

आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे खंदे समर्थक असलेल्या शिमॉन यांनी जगातील महान लोकशाही देश, अशा शब्दांत भारताचा गौरव केला होता. भारताला संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत स्थायी सदस्यत्व मिळण्यासाठी त्यांनी पाठिंबा दिला होता. महात्मा गांधी आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यासारखे महान नेते लाभणे हे भारताचे सुदैव आहे, असे पेरेझ म्हणाले हाते. महात्मा गांधी हे ‘प्रेषित’ आहेत, असा उल्लेख त्यांनी अनेकदा केला. भारत ही सर्वप्रथम एक संस्कृती आहे आणि त्यानंतर सर्वात मोठी लोकशाही आहे, असे पेरेझ हे २०१२ मध्ये भारताचे तत्कालीन परराष्ट्रमंत्री एस. एम. कृष्णा यांच्याशी बोलताना म्हणाले होते. भारतावर स्ततीसुमने उधळणाऱ्या शिमॉन यांनी तीन वेळा भारताला भेट दिली होती.

शिमॉन पेरेझ हे दूरदृष्टी असलेले महान नेते होते. त्यांनी आपले आयुष्य इस्त्रायलसाठी समर्पित केले. इस्त्रायलच्या विकासात त्यांचे योगदान मोठे आहे. बिन्यामिन नेत्यान्याहू, पंतप्रधान, इस्त्रायल

शिमॉन यांच्या निधनाने एक प्रकाश लोपला आहे. मानवी इतिहास बदलणाऱ्या महान व्यक्तींमध्ये त्यांचा समावेश करावा लागेल. बराक ओबामा, अध्यक्ष, अमेरिका

पेरेझ यांच्या निधनाने एक मार्गदर्शक आणि मित्र हरपला आहे. टोनी ब्लेअर, माजी पंतप्रधान, ब्रिटन

शांततेसाठी अविरत झटणारा महान नेता इस्त्रायलने गमावला आहे. त्यांच्याकडे अदभुत दूरदृष्टी होती. ज्ञान, तंत्रज्ञानाचे सामथ्र्य जाणणारे ते द्रष्टे व्यक्तिमत्व होते. प्रणव मुखर्जी, राष्ट्रपती,

जगाने एक महान नेता आणि भारताने एक चांगला मित्र गमावला आहे. या दुखात आम्ही इस्त्रायलसोबत आहोत. नरेंद्र मोदी, पंतप्रधान