जर्मनीमधील मुनिक शहरातील मध्यवर्ती ठिकाणी एका मॉलमध्ये शुक्रवारीअंदाधुंद गोळीबार करण्यात आला आहे. शॉपिंग मॉलमध्ये झालेल्या या गोळीबारामध्ये दहा लोक ठार झाल्याची माहिती जर्मन पोलिसांनी दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन मॉलमधील जमावाला बाहेर काढले आहे. या हल्ल्यामध्ये एकपेक्षा अधिक लोक असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे. हल्लेखोरांना ताब्यात घेण्यामध्ये पोलिसांना यश आलेले नाही. पोलिसांनी दिली आहे दरम्यान, पोलिसांनी ट्विटरच्या माध्यमातून नागरिकांना म्युनिक मॉल परिसरात न येण्याचे आवाहन देखील केले आहे. मॉलप्रशासनाने आम्ही सध्या संकटात असल्याचे सांगत इतर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. हा हल्यामागे दहशतवादी आहेत का? याचा जर्मनी पोलीस तपास करत आहेत.