विश्वातील द्रव्यापैकी ८५ टक्के द्रव्य हे कृष्णद्रव्य आहे, पण ते अदृश्य आहे, याचे कारण म्हणजे त्यात अतिशय दुर्मीळ स्वरूपाचे डोनट आकाराचे विद्युतचुंबकीय क्षेत्र आहे व आधी प्रस्तावित केल्याप्रमाणे खूप वेगळय़ा प्रकारची बले नाहीत, असे नवीन अभ्यासात निष्पन्न झाले आहे.
नवे काय?
अमेरिकेतील व्हँडरबिल्ट विद्यापीठातील भौतिकशास्त्रज्ञांच्या मते कृष्णद्रव्य हे मजोरना फर्मिऑन या मूलभूत कणांचे बनलेले आहे. या कणाचे अस्तित्व १९३० च्या सुमारास वर्तवण्यात आले होते. कृष्णद्रव्य हे मजोरना कणांचे बनलेले असते हे अनेक भौतिकशास्त्रज्ञांचे म्हणणे आहे, पण प्रा. रॉबर्ट शेअरर व त्यांचे शिष्य शिउ मॅन हो यांनी काही गणिती आकडेमोडीच्या आधारे असे दाखवून दिले की, हे कण अ‍ॅनापोल नावाचे डोनटच्या आकाराचे विद्युतचुंबकीय क्षेत्र धारण करण्यास सुयोग्य आहेत. हे विद्युतचुंबकीय क्षेत्रच या कणांना इतर कणांपेक्षा वेगळे गुणधर्म प्राप्त करून देत असते. इतर कण हे साधारण विद्युतचुंबकीय क्षेत्र धारण करीत असतात, ज्यात उत्तर-दक्षिण ध्रुव, धन व ऋण असतात. कृष्णद्रव्याची अनेक प्रारूपे असे मानतात की, अनेक वेगळय़ा बलांचा संबंध कृष्णद्रव्याशी येतो, ज्या बलांना आपण रोजच्या जीवनात सामोरे जात नाही. अ‍ॅनापोल कृष्णद्रव्य हे आपण शाळेत शिकतो त्या साधारण विद्युतचुंबकीय क्षेत्राचा वापर करीत असते, याच बलामुळे चुंबक लोखंडाला चिकटतात. अ‍ॅनापोल कृष्णद्रव्याचे अस्तित्व आहे किंवा नाही याचा फैसला लवकरच प्रयोगाअंती होईल, असे शेअरर यांचे मत आहे.
विशेष काय?  फर्मिऑन हे इलेक्ट्रॉन व क्वार्कचे बनलेले असतात व ते द्रव्याचे मूलभूत घटक आहेत. त्यांचे अस्तित्व १९२८ मध्ये पॉल डिरॅक यांनी दाखवून दिले होते. मजोरना फर्मिऑन्स हे विद्युतीयदृष्टय़ा उदासीन मूलभूत सममितीमुळे निसर्गत: ते अ‍ॅनपोल वगळता इतर विद्युतचुंबकीय गुणधर्म अंगीकारू शकत नाहीत असे हो यांचे म्हणणे आहे. अ‍ॅनापोल कृष्णद्रव्य कण असल्याचे हो व शेअरर यांनी सुचवले आहे. त्यांच्या मते हे कण विश्वाच्या निर्मितीच्या सुरुवातीच्या काळात प्रस्तावित इतर कृष्णद्रव्यांच्या कणांसारखेच नष्ट झाले व उर्वरित कणांनी कृष्णद्रव्य बनले असावे, असे ते म्हणतात

survival of marine species in danger due to ocean warming
विश्लेषण : महासागर तापल्याने प्रवाळ पडू लागलेत पांढरेफटक… जलसृष्टीचे अस्तित्वच धोक्यात?
forever particles marathi news, forever particles latest marathi news
विश्लेषण : जगभर पिण्याच्या पाण्यात आढळतात घातक `फॉरएव्हर पार्टिकल्सʼ… त्यांचे उच्चाटन अवघड का असते?
Why are total solar eclipses rare Why is April 8 solar eclipse special
विश्लेषण : ८ एप्रिलचे सूर्यग्रहण वैशिष्ट्यपूर्ण का ठरते? खग्रास सूर्यग्रहण दुर्मीळ का असते?
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…