बीजिंग- चीनमध्ये वायव्येकडील शिनजियांग प्रांतात मोठा भूकंप झाला असून त्यात ६ ठार तर इतर ४८ जण जखमी झाले आहेत, या भूकंपाची तीव्रता ६.५ रिश्टर होती.शिनजियांगच्या होटान परफेक्चर भागात हा धक्का बसल्याचे चायना अर्थक्वेक नेटवर्क सेंटरने म्हटले आहे. भूकंपाच्या धक्क्य़ाने सकाळी ९ वाजून सात मिनिटांनी पिशान पगण्याचा भाग हादरला, त्या भूकंपाची खोली १० किलोमीटर होती.शिनजियांग प्रांतातील नागरी प्रशासन विभागाने सांगितले, की सहा जण मरण पावले असून तीन हजार इमारती कोसळल्या आहेत, भूरंपात ४८ लोक जखमी झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे.