यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस होणार असल्याचा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे. यंदा ९५ टक्के पाऊस होईल, अशी शक्यता स्कायमेटने व्यक्त केली आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीत देशात ८८७ मिलीमीटर इतका पाऊस होईल, असे स्कायमेटने म्हटले आहे.

यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता शून्य टक्के असल्याचे स्कायमेटने म्हटले आहे. तर सरासरीपेक्षा अधिक पाऊस होण्याची शक्यता अवघी १० टक्के इतकी असेल. सरासरी इतका पाऊस पडण्याची शक्यता ५० टक्के इतकी आहे. तर सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याची शक्यता २५ टक्के आहे. तर दुष्काळ पडण्याची शक्यता १५ टक्के इतकी असेल, असे स्कायमेटने म्हटले आहे.

जून ते सप्टेंबर या कालावधीत किती पाऊस होऊ शकतो, याचा देखील अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे. जून महिन्यात सरासरीच्या तुलनेत १०२ टक्के पाऊस होईल, असे स्कायमेटने म्हटले आहे. जून महिन्यात १६४ मिलीमीटर पाऊस होईल, अशी शक्यता स्कायमेटकडून वर्तवण्यात आली आहे. जूनमध्ये सरासरीइतका पाऊस होण्याची शक्यता ७० टक्के असेल, तर सरासरीपेक्षा अधिक पाऊस होण्याची शक्यता २० टक्के असेल. सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस होण्याची शक्यता फक्त १० टक्के असेल, असे स्कायमेटने म्हटले आहे.

जुलै महिन्यात सरासरीच्या तुलनेत ९४ टक्के पाऊस होईल, असे स्कायमेटने म्हटले आहे. जुलैमध्ये २८९ मिलीमीटर पाऊस होईल, असे स्कायमेटने म्हटले आहे. जुलै महिन्यात सरासरी पाऊस पडण्याची शक्यता ६० टक्के इतकी असेल, तर सरासरीपेक्षा अधिक पाऊस होण्याचे शक्यता १० टक्के असू शकेल, अशी शक्यता स्कायमेटने वर्तवली आहे. जुलै महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याची शक्यता ३० टक्के असल्याचे स्कायमेटने म्हटले आहे.

ऑगस्ट महिन्यात सरासरीच्या तुलनेत ९३ टक्के पाऊस होईल, अशी शक्यता स्कायमेटने व्यक्त केली आहे. ऑगस्टमध्ये २६१ मिलीमीटर पाऊस होईल, असा अंदाज आहे. ऑगस्टमध्ये सरासरीइतका पाऊस पडण्याची शक्यता ६० टक्के असेल. तर सरासरीपेक्षा अधिक पाऊस होण्याची शक्यता फक्त १० टक्के असेल, असे स्कायमेटने म्हटले आहे. ऑगस्टमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याची शक्यता ३० टक्के असेल, असेही स्कायमेटने म्हटले आहे.

सप्टेंबर महिन्यात सरासरीच्या तुलनेत ९६ टक्के इतका पाऊस होईल, असा स्कायमेटचा अंदाज आहे. सप्टेंबरमध्ये १७३ मिलीमीटर पावसाची नोंद होई शकते, अशी शक्यता स्कायमेटकडून वर्तवण्यात आली आहे. सप्टेंबरमध्ये सरासरीइतका पाऊस पडण्याची शक्यता ५० टक्के इतकी आहे. तर सरासरीपेक्षा जास्त पाऊस होण्याची शक्यता २० टक्के आहे, असे स्कायमेटने म्हटले आहे. सप्टेंबरमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याची शक्यता ३० टक्के असल्याचे स्कायमेटने म्हटले आहे.