उत्तर प्रदेशात भाजपची सत्ता आल्यानंतर अवैध कत्तलखान्यांवर घालण्यात आलेल्या बंदीचा मुद्दा सध्या देशभरात गाजत आहे. योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होताच पोलिसांनी राज्यातील बेकायदा कत्तलखान्यांवर कारवाईचा सपाटा लावला आहे. पोलिसांनी आतापर्यंत केलेल्या धडक कारवाईत अनेक बेकायदा कत्तलखान्यांना टाळे ठोकले आहे. या पार्श्वभूमीवर आता देशातील धार्मिक राजकारण तापण्यास सुरूवात झाली आहे. कत्तलखाने बंद झाल्यामुळे अनेकांच्या रोजगारांवर आलेली गदा आणि या व्यवसायात विशिष्ट धर्माचेच लोक काम करतात का, हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. साधारणपणे गोमांस निर्यात करणारा समूह विशिष्ट धर्माशी संबंधित असतो, असा समज आहे. मात्र, यासंबंधी नुकतीच एक आश्चर्यकारक माहिती समोर आली आहे. ‘बीबीसी’ने दिलेल्या वृत्तानुसार भारतामध्ये गोमांसाची निर्यात करणारे सर्वात १० मोठे निर्यातदार हे हिंदूधर्मीय आहेत. केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाचा भाग असलेल्या शेती व प्रक्रिया खाद्य उत्पादन निर्यात प्राधिकरणाने ही माहिती प्रसिद्ध केली आहे. यामध्ये देशातील ७४ कत्तलखान्यांपैकी १० सर्वात मोठ्या कत्तलखान्यांचे मालक हिंदू असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

अल कबीर
अल कबीर हा देशातील सर्वात मोठा कत्तलखाना तेलंगणाच्या मेडक जिल्ह्यात आहे. सतीश सब्बरवाल हे या तब्बल ४०० एकरांच्या परिसरात पसरलेल्या कत्तलखान्याचे मालक आहेत. मुंबईच्या नरिमन पॉईंट परिसरात अल कबीरचे मुख्यालय असून या कत्तलखान्यातून अनेक आखाती देशांमध्ये गोमांसाची निर्यात केली जाते. दुबई, अबुधाबी, जेद्दा, कुवेत, मदीना , रियाद, खरमिश, सित्रा, मस्कत आणि दोहा या आखाती देशांमध्येही अल कबीरची कार्यालये आहेत. अल कबीरचे मालक सतीश सब्बरवाल यांनी धर्म आणि व्यवसाय या दोन्ही गोष्टी पूर्णपणे भिन्न असल्याचे म्हटले आहे. या दोन्हींची गल्लत करता कामा नये, असे मत सब्बरवाल यांनी मांडले. अल कबीरने गेल्या आर्थिक वर्षात ६५० कोटींचा व्यवसाय केला होता.

germany on delhi liquor scam arvind kejriwal
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेवर जर्मनीची टिप्पणी, भारताने सुनावले खडेबोल
cji dhananjay chandrachud pti photo
सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी देशवासीयांना केलं आश्वस्त; म्हणाले, “आम्ही पूर्णवेळ…”
What Sharad Pawar Said?
शरद पवारांचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना आव्हान “हिंमत असेल तर…”
Sujay Vikhe Patil
“खासदार करुन तुम्ही मला दूर लोटलंत, आता..”, सुजय विखे पाटील यांचं मोठं वक्तव्य

अरेबियन एक्स्पोर्टस
अरेबियन एक्स्पोर्टस प्रायव्हेट लिमिटेडचे मालक सुनील कपूर आहेत. अरेबियन एक्स्पोर्टसचे मुख्यालय मुंबईत आहे. अरेबियन एक्स्पोर्टसकडून गोमांसाबरोबर मेंढ्याचे मांसही निर्यात केले जाते. अरेबियन एक्स्पोर्टसच्या संचालक मंडळात विरनत नागनाथ कुडमुले , विकास मारूती शिंदे आणि अशोक नारंग यांचा समावेश आहे.

एमकेआर एक्स्पोर्टस
भारतामधील बीफच्या प्रमुख निर्यातदारांपैकी एक असलेल्या एमकेआर फ्रोजन फूड एक्स्पोर्टस प्रायव्हेट लिमिटेडचे मालक मदन एबट आहेत. या कंपनीचे मुख्यालय दिल्लीत आहे. या कंपनीचा कत्तलखाना पंजाबच्या मोहालीत असून या सनी एबट एमकेआर एक्स्पोर्टसचे संचालक आहेत.

अल नूर एक्स्पोर्टस
सुनील सूद यांच्या मालकीच्या अल नूर एक्स्पोर्टसचे मुख्यालय दिल्लीत आहे. मात्र, यांचा कत्तलखाना आणि मांस पक्रिया केंद्र उत्तरप्रदेशच्या मुजफ्फरनगरमध्ये स्थित आहे. मेरठ आणि मुंबईमध्ये अल नूर एक्स्पोर्टसच्या शाखा आहेत. १९९२ मध्ये स्थापन झालेली अल नूर एक्स्पोर्टस सध्याच्या घडीला ३५ देशांमध्ये गोमांसाची निर्यात करते.

एओवी एक्स्पोर्टस
२००१ साली स्थापन झालेल्या एओवी एक्स्पोर्टसचा कत्तलखाना उत्तर प्रदेशच्या उन्नावमध्ये आहे. याठिकाणी कंपनीचे मांस प्रक्रिया केंद्रही आहे. एओवी एक्स्पोर्टस मुख्यत्तेकरून बीफची निर्यात केली जाते. अभिषेक अरोरा हे एओवी एक्स्पोर्टसचे संचालक आहेत.

स्टँटर्ड फ्रोझन फूडस एक्स्पोर्टस प्रायव्हेट लिमिटेड
कमल वर्मा हे  स्टँटर्ड फ्रोझन फूडस एक्स्पोर्टस प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक आहेत. उत्तर प्रदेशच्या उन्नावमध्ये या कंपनीचा कत्तलखाना आहे.

पोन्ने प्रॉडक्टस एक्स्पोर्टस
एस. सस्ति कुमार हे पोन्ने प्रॉडक्टस एक्स्पोर्टस संचालक आहे. ही कंपनी मुख्यत्वेकरून बीफ आणि अंड्यांच्या निर्यातीचा व्यवसाय करते. तामिळनाडूच्या नमक्कालमध्ये कंपनीची शाखा आहे.

अश्विनी अॅग्रो प्रॉडक्टस
अश्विनी अॅग्रो प्रॉडक्टसचा कत्तलखाना तामिळनाडूच्या गांधीनगरमध्ये आहे. या कंपनीचे संचालक के. राजेंद्रन यांच्या मते धर्म आणि व्यवसाय या दोन्ही गोष्टी भिन्न आहेत. आपल्याला व्यवसाय करताना स्थानिक अधिकाऱ्यांच्या त्रासाला अनेकदा सामोरे जावे लागल्याचे के. राजेंद्रन यांनी सांगितले.

महाराष्ट्र फुडस प्रोसेसिंग
महाराष्ट्रातील फलटणमध्ये महाराष्ट्र फुड प्रोसेसिंग अँण्ड कोल्ड स्टोरेजचा कत्तलखाना आहे. सनी खट्टर या कंपनीतील भागीदार असून त्यांनीदेखील धर्म आणि व्यवसाय या दोन्ही भिन्न गोष्टी असल्याचे म्हटले आहे.