अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्याला हिमवादळाने तडाखा दिला असून न्यूयॉर्क शहर बर्फात माखून निघाल्याने भुताचे शहर वाटत होते. तेथील जनजीवन विस्कळित होऊन लाखो लोकांना फटका बसला.हिमवादळ फार काळ टिकले नाही तरी न्यूयॉर्कची गती त्याने रोखली, एकही विमान आकाशात दिसत नव्हते. एकही रेल्वे वेळेवर पोहोचत नव्हती. पहाटेच्यावेळी झालेल्या हिमवादळाने मॅनहटन येथे  रस्त्यावर असलेले अनेक ट्रक बर्फाने भरून गेले. न्यूजर्सीत सगळी वाहतूक व्यवस्था कोलमडली. हवामान अंदाजकर्त्यांनी हे हिमवादळ ऐतिहासिक असेल व काही मीटपर्यंत बर्फ कोसळेल असा इशारा दिला होता त्याचबरोबर वादळाची शक्यताही वर्तवली होती पण सकाळी इशारा बदलत गेला व न्यू इंग्लंड, बोस्टन यांना जास्त फटका बसेल असे सांगितले गेले व नंतर हिमवादळ अपेक्षेप्रमाणे गंभीर नसेल असे सांगण्यात आले.
  ईशान्येकडे ७७०० विमान उड्डाणे रद्द करावी लागली. बुधवापर्यंत विमानसेवा सुरळित होण्याची चिन्हे नाहीत. शाळा व उद्योग तातडीने बंद करण्यात आले. सरकारी कार्यालये बंद झाली.