स्टार वॉर मालिकेत दाखवलेल्या टाटुनी ग्रहमालेसारखी ग्रहमाला प्रथमच वैज्ञानिकांनी शोधली आहे. तिचे नाव एसडीएसएस १५५७ असून त्यात लघुग्रहाचे अवशेष दोन बटू ताऱ्यांभोवती फिरत आहत.े  त्यात एक श्वेतबटू तर दुसरा राखाडी बटू तारा आहे. युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनच्या वैज्ञानिकांनी ही ग्रहमाला शोधली असून टाटुनीसारखे ग्रह त्यात असावेत असा अंदाज आहे. हे ग्रह खडकाळ आहेत. आतापर्यंत जे बाह्य़ग्रह शोधले गेले आहेत ते गुरूसारख्या वायुरूपातील दोन ताऱ्यांभोवती फिरणारे आहेत ते बर्फाळ असण्याची शक्यता आहे. यापूर्वी शोधलेल्या ग्रहमालेतील तारकाप्रणाली ही कार्बन संपृक्त बर्फाळ पदार्थानी भरलेली आहे, तर एसडीएसएस १५५७ मधील ताऱ्यांमध्ये धातूचे प्रमाण जास्त असून त्यात मॅग्नेशियम व सिलिकॉनचा समावेश आहे. हे घटक ताऱ्यांमध्ये लघुग्रहातून आले असावेत.

चार किलोमीटर आकाराच्या लघुग्रहातील १.१ ट्रिलियन टन द्रव्य त्यांच्यात आले आहे. यूसीएलचे वैज्ञानिक जे फरिही यांनी सांगितले की, सूर्यासारख्या दोन ताऱ्यांभोवती खडकाळ ग्रह असणे हे आव्हान आहे कारण  दोन्ही ताऱ्यांचे गुरुत्व त्यांची ओढाताण करीत असते, त्यामुळे हे ग्रह बनण्यासाठीचे द्रव्य एकत्र कसे आले, हा प्रश्न आहे कारण त्यामुळेच हे  ग्रह तयार झाले आहेत. एसडीएसएस १५५७ ही ग्रहप्रणाली लघुग्रहांच्या कचऱ्यातून बनली असून त्यातून खडकाळ लघुग्रहांची माहिती मिळण्यास मदत होणार आहे. हा शोध म्हणजे आमच्यासाठी एक आश्चर्यच होते, असे शेफील्ड विद्यापीठाचे स्टीव्हन पार्सन्स यांनी सांगितले. एसडीएसएस १५५७ सारख्या दोन ताऱ्यांभोवतीच्या अनेक ग्रहमाला आहेत, पण अशी वेगळी ग्रहमाला प्रथमच सापडली आहे. यातील राखाडी बटू तारा धुळीने झाकला गेला असून तो गुरुत्वीय बलामुळे शोधता आला. जेमिनी ऑब्झर्वेटरी साऊथ टेलिस्कोप व द युरोपियन सदर्न ऑब्झर्वेटरी व्हेरी लार्ज टेलिस्कोप यांच्या मदतीने ही ग्रहमाला शोधण्यात आली. यात अधिक अभ्यास हबल दुर्बीणीच्या मदतीने केला जाईल, असे वॉरविक विद्यापीठाचे बोरिस गॅनसिक यांनी सांगितले. जर्नल नेचर अ‍ॅस्ट्रॉनॉमी या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.

Elon Musk
टेस्लातील १० टक्के कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर कुऱ्हाड, एलॉन मस्क यांनी मेलद्वारे दिला इशारा; म्हणाले, “खर्च कमी करण्यासाठी…”
cryptocurrency fraud marathi news
क्रिप्टो करंन्सीच्या नावावर युवकाने गमावले २३ लाख रुपये
rbi commemorative coins
पंतप्रधान मोदींच्या हस्ते ९० रुपयांचे नाणे लाँच, RBI ला ९० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल गिफ्ट
A decrease in the supply of new houses was recorded in eight metros of the country print news
नवीन घरांच्या पुरवठ्यात घट, यंदा पहिल्या तिमाहीत ६९ हजारांवर; गेल्या वर्षीच्या तुलनेत १५ टक्के कमी