देशातील तब्बल १.८ लाख कोटींच्या रखडलेल्या महामार्ग प्रकल्पांना येत्या महिन्याभरात नव्याने चालना देण्यात येणार असल्याचे केंद्रीय रस्ते-वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे.
या प्रकल्पांच्या रखडलेल्या अवस्थेबाबत यूपीए सरकारवर ताशेरे ओढत नितीन गडकरी म्हणाले की, या प्रकल्पांसाठीच्या आवश्यक जमिनीपैकी एकूण १० टक्के जमिन देखील यूपीए सरकारला अधिग्रहण करता आलेली नाही. देशभर तब्बल १.८ लाख कोटींचे १८९ प्रकल्प जमिन अधिग्रहण, वन आणि पर्यावरण विभागाची मंजूरी, रेल्वे मार्गावरील पुलाची मंजूरी इत्यादी अडथळ्यामंध्ये अडकलेले आहेत. हे सर्व अडथळे येत्या १५ ऑगस्टपर्यंत दूर करून  त्यांना प्रकल्पांना नव्याने चालना देण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. तसेच नव्या दोन लाख कोटींच्या प्रकल्पांचाही विचार केला जात असल्याचेही गडकरी म्हणाले.