शिक्षणाच्या अधिकाराची अंमलबजावणी केल्यानंतरही शिक्षण पोहोचविण्याच्या उद्दिष्टाचे फलित, हा अद्यापही चिंतेचाच विषय ठरत आह़े  त्यामुळे आता शिक्षण अधिकाराचे उद्दिष्ट गाठण्यासाठी मुलांना शाळेत आणण्याबरोबर आता विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शिकविण्यावर भर दिला पाहिजे, असे मत युनिसेफने व्यक्त केले आह़े
शिक्षणाच्या प्रवाहात मुलांना केवळ आणण्यावर केंद्रित असलेले लक्ष आता प्रत्यक्ष शिकविण्यावर केंद्रित केले पाहिज़े  सध्याचा भर शिक्षणासाठी प्रवेश मिळण्याच्या अधिकारावर आह़े  परंतु, आता शिकण्याच्या अधिकारावर भर दिला पाहिज़े  तसेच शिक्षणाचा दर्जा आणि मुला-मुलींमध्ये शिक्षणाबाबत समानता, गोष्टींकडेही लक्ष देण्यात आले पाहिजे, असेही युनिसेफच्या(भारत) शिक्षण विभागप्रमुख ऊर्मिला सरकार यांनी म्हटल़े
देशभरात विविध शिक्षण उपक्रमांमधून अपेक्षेपेक्षा कमी शैक्षणिक फलित निघत असल्याच्या निष्कर्षांच्या पाश्र्वभूमीवर सरकार यांनी हे विधान केले आह़े शिक्षणाच्या अधिकारावर मंगळवारी येथे आयोजित करण्यात आलेल्या गोलमेज परिषदेचे आयोजन करण्यात आले होत़े  त्या वेळी त्या बोलत होत्या़