कबुतरे इंग्रजी शब्द हे शब्द नसलेल्या घटकांपासून वेगळे ओळखू शकतात असे नवीन अभ्यासात दिसून आले आहे. कबुतरांची  या गुंतागुंतीच्या आकलनातील कामगिरी माकडांप्रमाणेच आहे. न्यूझीलंडमधील ओटागो विद्यापीठ व जर्मनीतील रूहर विद्यापीठ या दोन संस्थांतील वैज्ञानिकांनी हे संशोधन केले आहे. यात कबुतरांना संगणकाच्या पडद्याजवळ येऊन चार अक्षरी शब्दावर चोच मारायला शिकवण्यात आले किंवा चार अक्षरी पण प्रत्यक्ष शब्द नसलेल्या घटकावर चोच मारायची नाही हेही शिकवण्यात आले. उदाहरणार्थ यूआरएसपी हा शब्द नाही मग त्याच्यावर चोच मारायची नाही असे शिकवण्यात आले. संशोधकांनी चार कबुतरांवर हा प्रयोग करताना काही शब्द वाढवले व त्यांची शब्दशक्ती २६ वरून ५८ केली व एकूण ८००० अशब्द घटक त्यांना शिकवले. कबुतरांना शब्दांपेक्षा वेगळा घटक समजतो की नाही याची चाचपणी करण्यात आली. त्यांनी नवीन शब्दही चटकन ओळखले. अपेक्षेपेक्षा त्यांची कामगिरी चांगली होती. ओटागो विद्यापीठाचे डॅमियन स्कार्फ यांनी सांगितले की, बायग्रॅम्सच्या सांख्यिकी उपयोगातून हे यश आले. ईएन व एएल या अक्षर जोडय़ा शब्दांशी जास्त संबंधित असू शकतात. रूहर विद्यापीठाचे ओनुर गुंतुरकुन यांनी सांगितले की, कबुतरे उत्क्रांतीत ३०० दशलक्ष वर्षांनी माणसांपेक्षा वेगळी आहेत. त्यांची मेंदूरचना वेगळी आहे. बर्ड ब्रेन या शब्दांचा फेरविचार करण्याची वेळ आली आहे, असे ओटागो विद्यापीठाच्या मायकेल कोलंबो यांनी सांगितले. पीएनएएल या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.

out there screaming book
बुकबातमी: ‘भयप्रेमीं’साठीचा दस्तावेज..
The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!
Controversy on Ramayana
सीतेच्या हातून रावणाला गोमांस, हनुमानाचं विकृत चित्रण, विद्यापीठातील नाटकाचा वाद आहे काय?
Reading of Dabholkar book
सांगली : ब्रेल लिपीतील दाभोळकरांच्या पुस्तकाचे अंध मुलांकडून वाचन