इराकची राजधानी बगदाद शहर पुन्हा एकदा बॉम्बस्फोटाने हादरले आहे. एका आइस्क्रीम दुकानात आत्मघातकी हल्लेखोराने केलेल्या या स्फोटात किमान ८ जणांचा मृत्यू झाला असून २२ जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

सोमवारी रात्री उशिरा हा स्फोट झाला. सध्या रमजानचा महिना सुरु असल्याने संध्याकाळनंतर बाजारपेठेत मोठी गर्दी झाली होती. त्याचवेळी हा स्फोट करण्यात आला. या बॉम्बस्फोटाची आतापर्यंत कोणत्याही दहशतवादी संघटनेने जबाबदारी स्वीकारलेली नाही. मात्र, हा बॉम्बस्फोट आयसिसने केल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मागील वर्षी बगदादमध्ये रमजानच्याच महिन्यात ट्रक बॉम्ब हल्ला करण्यात आला होता. यात १०० जणांना आपले प्राण गमवावे लागले होते.