तो मी नव्हेच..असे सांगूनही विमानकंपन्या अडवणूक करीत असल्याची भाजप खासदार सुनील गायकवाडांची तक्रार

untitled-1

पक्ष वेगवेगळा असला तरी ते दोघे सख्खे शेजारी. एक उस्मानाबादचे शिवसेना खासदार, तर दुसरे शेजारच्या लातूरचे खासदार. पण आता एकाने केलेल्या ‘पराRमा’ची ‘शिक्षा’ दुसरयाला भोगावी लागत आहे.. त्यांचा गुन्हा एकच. नामसाधम्र्य!

दोघेही खासदार आणि दोघांचेही आडनाव गायकवाड. बिझनेस श्रेणीचे तिकीट असताना इकॉनॉमी श्रेणीमध्ये बसविल्याचा राग येऊन शिवसेनेचे उस्मानाबादचे खासदार प्रा. रवींद्र गायकवाड यांनी एअरम् इंडियाच्या व्यवस्थापकाला चपलीने मारहाण केल्याचे प्रकरण गाजते आहे. तेव्हापासून खा. रवींद्र गायकवाड यांच्यावर एअरम् इंडियासह सर्वच विमानकंपन्यांनी हवाईबंदी घातली आहे. विमानाचे तिकीट काढण्याचा प्रय खासदार रवींद्र गायकवाडांनी केला, की विमानकंपन्यांकडून ते लगोलग रद्द होते. कारण रवींद्र गायकवाडांना विमानतळावर पायसुद्धा ठेऊ न देण्याचे अनौपचारिक आदेशच कंपन्यांनी व विमानतळ प्राधिकरणाने सुरक्षा रक्षकांना दिले आहेत. त्यामुळे खासदार गायकवाड असे म्हटले की सुरक्षा यंत्रणांचे कान टवकारतात..

पण नेमका याचाच फटका लातूरचे भाजप खासदार डॉ. सुनील गायकवाडांना बसतो आहे. हैदराबादहून दिल्लीला येताना विमानतळावर त्यांना नाना चौकश्यांना तोंड द्यवे लागले. ‘तो मी नव्हेच..’, असे पटवून देताना ते हैराण झाले. अखेरीस त्यांना शेवटी प्रवास करू दिला; पण तोपर्यंत पुरता मन:स्ताप झालेल्या खासदार सुनील गायकवाडांनी थेट नागरीविमान खात्याचे राज्यमंत्री जयंत सिन्हा यांच्याकडेच तर केली. ‘गायकवाड नावाचा खासदार असणे हा काही गुन्हा आहे का?’, असा सवाल त्यांनी सिन्हांना विचारला.

‘खासदार रवींद्र गायकवाडांनी केलेल्या कृतीबद्दल मी काही बोलणार नाही. मी काही त्यांच्यासारखी कृती करणार नाही. कारण भगवान गौतम बुद्धांचा भक्त् आहे.

त्यामुळे त्यांच्याबाबत जो काही निर्णय घ्यायचाय तो घ्यावा.. पण मला का त्याची शिक्षा दिली जातेय? फक्त आडनाव गायकवाड असल्यावरून एवढा गहजब का केला जातोय?,’ असा सवाल त्यांनी केला.

गायकवाडांनाच धक्काबुक्की झाल्याचा शिवसेनेचा आरोप

खासदार रवींद्र गायकवाड यांच्यावरील हवाईबंदी उठविण्यासाठी शिवसेनेच्या खासदारांनी पुन्हा एकदा लोकसभा सभापती सुमित्रा महाजनांचे दरवाजे ठोठावले. त्याचवेळी एअर इंडियाच्या कर्मचारयांनीच गायकवाडांना धक्काबुक्की आणि शिविगाळ केल्याचा आरोप शिवसेना खासदारांच्या शिष्टमंडळाने केला. त्यासंदर्भातील व्हिडीओ क्लिपदेखील महाजनांना दाखविली. त्याचबरोबर ज्या कायद्यचा हवाला देऊन ही कारवाई केली आहे, त्या हवाई विमानविषयक आवश्यकता नियमावलीमध्ये (सिव्हील एॅव्हिएशन रूल्स : ‘कार’) एखाद्य प्रवाशावर हवाईबंदी घालण्याचा कोणताही अधिकार विमानकंपन्यांना दिलेला नसल्याकडे महाजनांचे लक्ष वेधले. मात्र, त्यांच्याकडून फार सकारात्मक प्रतिसाद मिळाला नसल्याचे सांगण्यात आले. दुसरीकडे शिवसेनेने दिलेली हक्कभंग नोटीसही महाजनांनी अद्यपपर्यंत स्वीकारलेली नाही.