मुंबई वृत्तान्त
ठाणे/नवी मुंबई वृत्तान्त
नगर/पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त
नाशिक/उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त
मराठवाडा वृत्तान्त
नागपूर/विदर्भ वृत्तान्त
- पाणी प्रश्नावरून नगरसेवक व नागरिकांनी 'ओसीडब्ल्यू'च्या कार्यालयातील साहित्य जाळले
- शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या हाती पुस्तके पडणार
रविवार वृत्तान्त
विदर्भरंग
मोस्ट कमेन्टेड
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या आयोजनादरम्यान एका स्विस कंपनीला नियम डावलून कंत्राट दिल्याने ९० कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी आयोजन समितीचे निलंबित अध्यक्ष व काँग्रेस खासदार सुरेश कलमाडी यांच्यासह दहा जणांविरोधात फसवणुकीचे आरोप निश्चित करण्याचे आदेश दिल्लीतील न्यायालयाने शुक्रवारी दिले. त्यामुळे कलमाडी चांगलेच अडचणीत सापडले आहेत.
२०१० साली दिल्लीत झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धासाठी वेळदर्शक तंत्रज्ञान तसेच गुणफलक यंत्रणा पुरवण्यासाठी स्पेनच्या कंपनीची कमी रकमेची निविदा डावलून स्विस टायमिंग ओमेगा या कंपनीला कंत्राट देण्यात आल्याचे या घोटाळय़ाचा तपास करणाऱ्या सीबीआयच्या निदर्शनास आले होते. यामुळे सरकारी तिजोरीला ९० कोटींचा तोटा झाल्याचेही उघड झाले. त्यामुळे स्पर्धा आयोजन समितीचे तत्कालीन प्रमुख सुरेश कलमाडी व अन्य नऊ जणांविरोधात फसवणूक करणे, कटकारस्थान करणे व पदाचा दुरुपयोग या आरोपांखाली आरोप निश्चित करण्याचे आदेश विशेष सीबीआय न्यायालयाचे न्या. तलवंत सिंग यांनी शुक्रवारी दिले.
ऑलिम्पिक समितीचे माजी सचिव ललित भानोत, समितीचे महासंचालक व्ही. के. वर्मा, सुरजित लाल, ए. एस. व्ही. प्रसाद व एम. जयचंद्रन या पदाधिकाऱ्यांवरही आरोप निश्चित करण्यात येणार असून त्यासाठी न्यायालयाने सीबीआयला १० जानेवारीपर्यंत मुदत दिली आहे.
संगनमत करून कंत्राटवाटप
वेळदर्शक तंत्रज्ञान व गुणफलक यंत्रणा बसवण्याचे कंत्राट स्विस टायमिंग ओमेगाला देण्याचे कलमाडी यांनी या कामाच्या निविदा काढण्यापूर्वीच ठरवले होते. स्पॅनिश कंपनीने ६२ कोटी रुपयांत ही यंत्रणा पुरवण्याचे निविदेत मान्य केले होते. या दोन्ही कंपन्यांच्या निविदा ४ नोव्हेंबर २००९ रोजी खुल्या करण्यात आल्या. मात्र, प्रत्यक्षात कलमाडी व वर्मा यांनी १२ ऑक्टोबर रोजीच हे कंत्राट स्विस टायमिंग ओमेगाला देण्याचे जाहीर केले होते.




















आरोप सिद्ध व्हायच्या अगोदर कलमाडींना तुरुंगवास झालेला आहे.एकही आरोप सिद्ध झाला नाही.सर्व जण विसरलेत की राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा सुरु होण्या आधी अनेक महत्वाच्या कामांना विलंब झाला होता. कोणत्याही स्थितीत कामे शिल्लक ठेवायची नाहीत म्हणून पंतप्रधानांनी लक्ष घातले व काम पुर्णत्वाला नेले. या राष्ट्रकुल स्पर्धांना ७०,००० कोटी खर्च झालेत.६० कोटीचे काम नगण्य आहे. काम याच कम्पनीला का दिले याची १० कारणे असू शकतात.काम अगोदर दिले नंतर निविदा मागविल्या याला सुद्धा समर्पक उत्तर देता येईल. या बातमीमध्ये कलमाडी कचाट्यात सापडण्यासारखे काही नाही.न्यायालयाने सीबीआयला१0 जानेवारी पर्यंत मुदत दिलेली आहे. साल २०२० वार्ताहार लिहायला विसरला वाट्ते. हा केवळ फार्स आहे.न्याय होणे शक्य आहे काय?