मुंबई वृत्तान्त
ठाणे/नवी मुंबई वृत्तान्त
- घाऊक बदल्यांच्या बडग्याने जिल्हा परिषदेच्या शिक्षकांमध्ये असंतोष
- एलबीटीचा भरणा सुरू; व्यापाऱ्यांमध्ये फूट
नगर/पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त
- 'एलबीटी' संदर्भात व्यापा-यांची बैठक
- सीमा तपासणी नाक्यांमुळे राज्याच्या महसूल उत्पन्नात वाढ होणार- मुख्यमंत्री
नाशिक/उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त
मराठवाडा वृत्तान्त
नागपूर/विदर्भ वृत्तान्त
रविवार वृत्तान्त
विदर्भरंग
मोस्ट कमेन्टेड
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात भारतीय जनता पक्षाकडून आपल्याला लक्ष्य केले जाणार आहे, हे लक्षात आल्यावर केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी दोन पावले मागे येण्याचे ठरविले आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शिंदे हे भाजपच्या नेत्यांच्या संपर्कात असून, गरज पडल्यास हिंदू दहशतवादाबद्दल केलेले विधान मागे घेण्याची तयारीही त्यांनी दर्शविली आहे.
शिंदे यांनी भाजपच्या नेत्यांशी संपर्क साधून हिंदू दहशतवादावरून केलेल्या विधानावरून संसदेमध्ये फार मोठा गोंधळ होऊ नये, यासाठी नव्याने आपली भूमिका मांडणारे वक्तव्य करण्याची तयारी दाखविली. मात्र, शिंदे काहीतरी थातूरमातूर बोलून वेळ मारून नेतील, अशी शंका आल्याने ते जोपर्यंत आधीच्या वक्तव्याबद्दल माफी मागणार नाहीत, तोपर्यंत आमच्या भूमिकेत बदल करणार नाही, असे भाजपच्या नेत्यांनी ठरविले आहे.
शिंदे हे लोकसभेचे नेते आहेत. अर्थसंकल्पीय अधिवेशनात सभागृह नेते म्हणून त्यांच्या सर्व कामकाजावर बहिष्कार घालण्याचे भाजपच्या नेत्यांनी ठरविले आहे. त्यांनी जर पक्षनेत्यांची बैठक बोलावली, तर त्यावरही पक्ष बहिष्कार घालणार आहे. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भगव्या दहशतवाद्यांची शिबिरे चालवतात, असे वक्तव्य शिंदे यांनी जयपूरमधील अधिवेशनात केले होते.




















माननीय गृहमंत्र्यांनी बहिष्काराला घाबरून माफी मागू नये. कसाब आणि अफझलला फाशी देणाऱ्या वीरपुरुषाला हे शोभत नाही. पुरावा होता म्हणूनच ते तसे बोलले असणार. मागच्याच आठवड्यातील लोकसत्तात त्यांचे असे स्टेटमेंट होते. (१० फेब्रुवारी २०१३). देशाच्या सुरक्षिततेला धोका पोहोचविणाऱ्या सर्वांवर कोर्टात केसेस घालाव्यात. हिंदू दहशतवादी आहेत हे त्यांनी जगाला सिद्ध करून दाखवावे.
जर हे खरे नसेल तर त्यांनी केवळ संघ किंवा भाजप यांची माफी न मागता, समस्त हिंदू समाजाची माफी मागावी आणि नैतिक (?) जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा.