स्टॉकहोमच्या उपनगरातील जिल्ह्य़ांमध्ये गेल्या काही दिवसांपासून हिंसाचाराचा उद्रेक झाला असला तरी शुक्रवारी रात्रीच्या हिंसाचाराची तीव्रता कमी होती. या हिंसक घटनांमध्ये २५ गाडय़ा जाळण्यात आल्या, असे पोलिसांनी सांगितले. या हिंसाचारप्रकरणी आतापर्यंत १९ जणांना अटक करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी पोलिसांवर दगडफेकीचे प्रकार घडले होते. मात्र शुक्रवारपासून असा कोणताही प्रकार घडला नसल्याचे पोलिसांनी सांगितले. स्टॉकहोममधील उपनगरांमध्ये मुख्यत्वे स्थलांतरितांचे वास्तव्य असून एका चाकूधारी व्यक्तीला पोलिसांनी गोळ्या घालून ठार मारल्यानंतर तेथे पोलिसांच्या क्रूरतेच्या विरोधात िहसाचाराचा उद्रेक झाला. या स्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी अन्य भागांतून कुमक मागविण्यात आली आहे.