सीरियाची राजधानी दमास्कसच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ गुरुवारी स्फोट झाला. स्फोटाचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असले तरी स्फोटाच्या आवाजांनी संपूर्ण शहर हादरले होते. गुरुवारी सकाळी हा स्फोट झाला.

दमास्कसमधील विविध संघटनांनी आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि लष्करी हवाई दलाजवळ स्फोटांचे आवाज आल्याचे वृत्त दिले आहे. स्फोटाच्या आवाज जिथून आला तिथे आग लागल्याचे दिसते असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. दहशतवाद्यांनी हा स्फोट घडवला होता का, या स्फोटात किती जण जखमी झाले हे अजूनही अस्पष्ट आहे.