तामिळनाडू विधानसभेत मुख्यमंत्री ई. पलानीस्वामी यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. पलानीस्वामी यांना १२२ आमदारांनी पाठिंबा दिला असून ओ.पन्नीरसेल्वम यांना फक्त ११ आमदारांनीच पाठिंबा दिला आहे. विश्वासदर्शक ठरावात विजय झाल्याने पलानीस्वामी हे तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदी कायम असतील हे स्पष्ट झाले आहे.

ई. पलानीस्वामी यांनी गुरूवारी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर तामिळनाडूच्या राजकारणाने आणखी एक नाट्यमय वळण घेतले. या अनपेक्षित वळणामुळे काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्रिपदाचे प्रबळ दावेदार असणारे ओ. पनीरसेल्वम पूर्णपणे एकटे पडल्याचे चित्र निर्माण झाले. मोजक्या खासदारांचा पाठिंबा वगळता अण्णाद्रमुकमधील सर्वजण त्यांच्यापासून दुरावले आहेत. राजभवनात ई. पलानीस्वामी यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीला सर्व आमदारांनी झाडून लावलेली उपस्थिती याबद्दल बरेच काही सांगून जाणारी होती.  शनिवारी झालेल्या विश्वासदर्शक ठरावात एआयएडीएमकेच्या १२२ आमदारांनी पलानीस्वामी यांच्या बाजूने मतदान केले. पलानीस्वामी यांनी विश्वासदर्शक ठरावात ६४ मत मिळणे गरजेचे होते. राज्याच्या इतिहासात अशा प्रकारचा विश्वासदर्शक ठराव ३० वर्षांत प्रथमच मांडण्यात आला होता.

ओ. पन्नीरसेल्वम यांना दणका बसला आहे. पन्नीरसेल्वम यांना फक्त ११ आमदारांनीच पाठिंबा दिल्याने ते एकाकी पडल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले.  राज्याच्या इतिहासात अशा प्रकारचा विश्वासदर्शक ठराव ३० वर्षांत प्रथमच मांडण्यात आला होता. विरोधकांनी (पन्नीरसेल्वम गटाने) अम्मा सरकारविरोधात काम केले. पण आता अम्माचे (जयललिता) खरे समर्थक पुढे आले असे पलानीस्वामी यांनी सांगितले.