विद्यार्थ्यांना शिकवून नवीन आव्हानांचा सामना करण्यास त्यांना तयार करणे हे शिक्षिकांचे काम असते. देशातील बहुतांश शिक्षक हे आपले काम प्रामाणिकपणे पार पाडत असतात. परंतु गुजरातमधील एका शिक्षिकेने असे कृत्य केले आहे त्यामुळे तिच्या सहकाऱ्यांना देखील शरमेनी मान खाली घालण्याची वेळ आली आहे.  पोरबंदर येथील एका शाळेत एका शिक्षिकेनी आपल्या विद्यार्थ्यांना आपल्या फोनमधील क्लिप दाखवल्या. तसेच त्यांच्यासमोर अंगविक्षेप करत नृत्य देखील केला. जर ही बाब तुम्ही इतर कुणाला सांगितली तर याद राखा असे देखील त्या शिक्षिकेनी मुलांना खडसावले. तिच्या या वागण्यामुळे मुलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

एका विद्यार्थिनीने ही बाब आपल्या पालकांना सांगितले. ही गोष्ट त्यांना कळताच पालकांचे पित्त खवळले. शाळेत नेमका काय प्रकार चालत आहे याची विचारणा त्यांनी शाळेच्या प्रशासनाकडे केली. हा प्रकार ऐकून त्यांना देखील धक्का बसला. आपल्या शाळेत असे काही घडते याबाबत आपल्याला कल्पनाच नव्हती असे त्यांनी म्हटले. या तक्रारीनंतर त्यांनी मुलांना त्या शिक्षिकेबाबत विचारले असता अनेक गोष्टींचा खुलासा झाला. एका खोलीमध्ये नेऊन ती शिक्षिका त्यांच्यासमोर अर्धनग्न अवस्थेत नाचत असे. हे देखील विद्यार्थ्यांनी सांगितले.

त्यानंतर तिची तक्रार पोलिसांकडे करण्यात आली. पोलिसांनी तिची चौकशी केली. त्यावेळी तिने या सर्व गोष्टी मान्य केल्या. तिच्या मोबाइलमध्ये अनेक क्लिप आढळून आल्या. तिचा मोबाइल जप्त करण्यात आला आहे तसेच तिला अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मुलांना नेमकं कुणाच्या भरवशावर सोडून जायचे असा प्रश्न पालक विचारत आहे. भविष्यामध्ये अशा घटना घडू नये यासाठी काळजी घेतली जाईल अशी खात्री प्रशासनाने पालकांना दिली आहे.