अमेरिकी लोकसंख्येत अवघा एक टक्का प्रमाण असलेल्या भारतीय वंशाच्या अमेरिकी लोकांचे ओबामा प्रशासनातील प्रतिनिधित्व वाढले असून आतापर्यंत एवढय़ा संख्येने भारतीय वंशाचे अमेरिकी लोक ओबामा प्रशासनात कधीच नव्हते. प्रशासनाच उच्च पदांवर त्यांना स्थान मिळाले आहे.अध्यक्ष बराक ओबामा यांनी भारतीय वंशाच्या अमेरिकी लोकांची बुद्धिमत्ता व त्या समाजाची क्षमता ओळखून त्यांना चांगले स्थान दिले आहे. भारतीय वंशाच्या अमेरिकी लोकांची संख्या अमेरिकेत ३१ लाख इतकी आहे.
केवळ प्रशासनातच नव्हे तर अमेरिकी सरकारच्या व्हाइट हाउस, परराष्ट्र, अर्थ, संरक्षण व व्यापार अशा अनेक विभागांमध्ये त्यांना स्थान देण्यात आले आहेत. ओबामा प्रशासनाच्या अगोदरच्या काळात नेमके भारतीय वंशाचे किती अमेरिकी लोक घेतले आहेत याचा निश्चित आकडा समजला नसला, तरी या वेळी निदान पन्नास जणांना त्यात स्थान मिळाले आहे.      

सुब्रा रमेश यांना नॅशनल सायन्स फाउंडेशनचे संचालकपद देण्यात आले होते. पहिल्या चार वर्षांच्या अखेरीस ओबामा प्रशासनात भारतीय वंशाचे २४ जण हे उच्च पदांवर होते. युसेदच्या आशिया ब्युरोच्या सहायक प्रशासक निशा बिस्वाल, अमेरिकेच्या व्यापारी प्रतिनिधी मंडळातील मुख्य कृषी संवादक इस्लाम सिद्दिकी, ऊर्जा खात्यातील पर्यावरण व अणुकार्यक्रम विभागाच्या उपप्रमुख प्रिया अय्यर यांचाही समावेश आहे. मैथिली रामन (न्याय), शुभश्री रमानाथन (अंतर्गत सुरक्षा) श्री श्रीनिवासन (न्याय), किरण आहुजा ( व्हाइट हाउस), नीलेश केमकर (अंतर्गत सुरक्षा), लोपा पी कोलुरी (गृहनिर्माण व शहर विकास), तारा रंगराजन (सहायक, संयुक्त राष्ट्रे), जेरेमी बेर्नटन (रोजगार नियोजन), रचना रुची भौमिक (सहायक, व्हाइट हाउस) मोठय़ा संख्येने भारतीय वंशाचे लोक ओबामा प्रशासनात आहेत. त्यात शिल्पा फडके (उपसंचालक, मंत्रिमंडळ कामकाज), गौतम राघवन (सहायक संचालक, सार्वजनिक कार्यक्रम विभाग, व्हाइट हाउस), अनीस रामन (अध्यक्षांचे भाषण लेखक, व्हाइट हाउस), ऋषी सेहगल (व्हाइट हाउसमधील उप सहायक), केवीन सामी ( विशेष सहायक, व्हाइट हाउस), कमला वसघम (अध्यक्षांच्या विशेष सहायक), रोहन पटेल (सार्वजनिक कार्यक्रम, सहायक संचालक), पुनीत तलवार (वरिष्ठ संचालक आखाती देश), अरुण चौधरी (व्हाइट हाउसचे व्हिडिओग्राफर) यांच्या नेमणुकाही महत्त्वाच्या आहेत. रशाद हुसेन (ओआयसी मधील खास दूत), फराह पंडित (मुस्लीम समाजाच्या खास प्रतिनिधी), पॉला गंगोपाध्याय ( राष्ट्रीय संग्रहालय व वाचनालय सेवा मंडळ), सोनी रामस्वामी, ( संचालक, नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ फूड अँड अ‍ॅग्रीकल्चर) रोमेश वधवानी (विश्वस्त केनेडे सेंटर फॉर परफॉर्मिग आर्ट्स), अनुज सी देसाई ( फॉरेन क्लेम कमिटी), रिचर्ड वर्मा, नीरा, रो खन्ना व अनिल काकणी यांचीही महत्त्वाच्या पदी वर्णी  आहे.