सध्याच्या टेक्नोसॅव्ही जगात दररोज नवनवीन गॅझेट्स दाखल होतात. बाजारात येणा-या असंख्य स्मार्टफोनपैकी आपण कोणता घ्यायचा असा प्रश्न प्रत्येकालाच पडला असतो. पण आता या प्रश्नांची उत्तर शोधण सोपे होणार आहे. इंडियन एक्सप्रेस डिजिटलने आता टेकहुक ही वेबसाईट सुरु केली असून http://www.Techook.com या वेबसाईटवर वाचकांना स्मार्टफोन, गॅझेटची माहिती जाणून घेता येणार आहे. टेकहुक.कॉमचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे डेस्कटॉप आणि मोबाईलसाठी कार्डवर आधारित यूआय. यामुळे ही वेबसाईट भारतात जागतिक दर्जाचे यूआय असलेली वेबसाईट ठरणार आहे.

बाजारपेठेत दाखल होणा-या स्मार्टफोनचा विविध पैलूंनी आढावा घेणे गरजेचे असते. टेकहुकमध्ये सात दिवस विविध निकषाच्या आधारे स्मार्टफोनचा आढावा घेतला जाईल. रिव्ह्यू देताना एकही बाजू सुटणार नाही आणि वाचकांना सखोल माहिती मिळेल यावर भर दिला जाणार आहे. याशिवाय टेकहुकमध्ये टेक जगतामधील बातम्यांसोबतच व्हिडीओदेखील बघता येणार आहे.

टेकहुकच्या लाँचप्रसंगी इंडियन एक्सप्रेस डिजिटलचे सीईओ संदीप अमर म्हणाले, टेकहुक हे नावीन्यपूर्ण माध्यम भारतात लाँच करण्यात आले आहे. या वेबसाईटची डिझाईन आणि यूआयदेखील नवीन आहे. स्मार्टफोनमधील प्रत्येक फिचर आणि अन्य बाबींचा सखोल आढावा या वेबसाईटवर घेतला जाणार आहे. वाचकांच्या दृष्टीनेच ही वेबसाईट तयार केल्याचे त्यांनी सांगितले. टेकहुक वाचकांच्या पसंतीस उतरेल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. सध्या स्मार्टफोन आणि भविष्यात अन्य गॅझेटची माहिती दिली जाईल असे त्यांनी आवर्जून सांगितले.

स्मार्टफोन घेण्याचा निर्णय सोपा व्हावा यासाठी ही वेबसाईट उपयुक्त ठरु शकेल असा विश्वास संदीप अमर यांनी व्यक्त केला. तंत्रज्ञानाचा लाभ लोकांना कसा मिळू शकतो याचे उदाहरण म्हणजे टेकहुक ही वेबसाईट ठरु शकेल. या वेबाईटमध्ये कार्ड फॉर्मेट ले आऊट पद्धतीचा वापर करण्यात आला आहे. यात यूजर्स वेबसाईटवरील एक पेज न सोडताच दुस-या पेजवरही जाऊ शकतील. डिजिटल विश्वात तंत्रज्ञानाचा वापर करण्याशिवाय पर्याय नसतो आणि हाच अनुभव तुम्हाला टेकहुक या वेबसाईटच्या डिझाईनमध्येही दिसून येईल असे संदीप अमर यांनी सांगितले.

techook-1