चौदा वर्षांच्या एका मुलीवर चार जणांनी चालत्या मोटारीत सामूहिक बलात्कार केल्याची घटना बरेली जिल्ह्य़ातील फरीदपूर वसाहतीत  घडली.
ही मुलगी शाळेत जात असताना स्पोर्ट्स युटिलिटी व्हेईकलमधून आलेल्या युवकांनी तिचे अपहरण करून वाहनात तिच्यावर बलात्कार केला. घरी आल्यानंतर या मुलीने ही घटना कुटुंबीयांना सांगितली. त्यानंतर चार आरोपींवर प्राथमिक माहिती अहवाल दाखल करण्यात आला. दरम्यान, या मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून तिच्यावर बलात्कार झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे, असे ग्रामीण पोलीस अधीक्षक ब्रिजेश श्रीवास्तव यांनी सांगितले. दरम्यान, या घटनेनंतर स्थानिक लोकांनी पोलिसांनी तक्रार दाखल करण्यास विलंब केल्याचा आरोप केला असून या प्रकरणी कठोर कारवाईची मागणी केली आहे.