तेलंगण सरकारने आत्महत्या करणा-या शेतक-यांच्या कुटुंबीयांना मिळणा-या आर्थिक मदतीमध्ये वाढ केली आहे.  दिड लाखांऐवजी आता सहा लाख रुपयांची मदत शेतक-यांना करण्यात येणार आहे.
यापूर्वी शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना दीड लाख रुपये देण्यात येत होते. यामध्ये आता चौपट वाढ करण्यात आली आहे.  आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांच्या मदतीत वाढ करण्याता निर्णय तेलंगण सरकारने शनिवारी घेतला.  त्याचबरोबर आत्महत्याग्रस्त शेतकऱयाच्या मुलीच्या लग्नासाठी ५१ हजार रूपयांची मदत देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णयसुद्धा तेलंगणा सरकारने घेतला आहे.
आंध्र प्रदेश सरकारने फेब्रुवारीमध्ये शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपये मदत करण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हापासून तेलंगण सरकारवर मदतनिधीमध्ये वाढ न करण्याचा निर्णय घेत नसल्याने टीका होत होती. अखेर तेलंगण सरकारने ही भरघोस वाढ करण्याचा निर्णय घेतला.