संपूर्ण काश्मीर खोरे थंडीने गारठले असून तेथे पारा गोठणबिंदूच्या खाली गेला आहे, काश्मीरची उन्हाळी राजधानी असलेल्या श्रीनगरसह सर्वच ठिकाणी तापमान खाली गेले आहे. श्रीनगरमध्ये तापमान उणे ०.५ अंशापर्यंत खाली आले आहे.

लडाखमधील लेह येथे उणे ७.१ अंश तापमानाची नोंद झाली. कारगिल शहरात उणे ६.६ अंश तापमानाची नोंद झाली असून उत्तर काश्मीरमधील गुलमर्ग येथे उणे ४.६ अंश तर पहलगाम येथे उणे ३.५ अंश तापमानाची नोंद झाली. उत्तर काश्मीरमधील कुपवाडा शहरात उणे १.१ अंश सेल्सियस तर काश्मीर खोऱ्याचे प्रवेशव्दार असलेल्या काझीगुंड येथे उणे ०.८ अंश तापमानाची नोंद झाली.