थंडगार आणि बोचऱ्या वाऱ्यांनी थंडीची तीव्रता वाढत असतानाच बुधवारी महानगरातील कमाल तापमान ९.८ अंश सेल्सियस एवढे नोंदविण्यात आले. कमाल तापमानाचा गेल्या ४४ वर्षांतील हा नीचांक मानला जातो. याआधी, १९६९ मध्ये एवढय़ा कमी तापमानाची नोंद झाली होती, असे हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. शहरातील किमान तापमान ४.८ अंश सेल्सियस एवढे नोंदविण्यात आले. सरासरीपेक्षा ते ०.८ अंशांपेक्षा कमी होते. सध्या राजधानीत थंडीचा कडाका जबरदस्त जाणवत असून दुपारीही मोठय़ा प्रमाणावर सोसाटय़ाचे वारे वाहतात.