पंचतारांकित हॉटेल लक्ष्य; २२ जण ठार  २० भारतीयांची सुखरूप सुटका
पॅरिस हल्ल्याच्या स्मृती ताज्या असतानाच शुक्रवारी आफ्रिका खंडाच्या उत्तरेला असलेल्या माली देशाच्या राजधानीत दहशतवाद्यांनी एका पंचतारांकित हॉटेलला लक्ष्य केले. हॉटेलातील १७० जणांना या दहशतवाद्यांनी ओलिस ठेवले होते. तब्बल नऊ तास हे ओलिसनाटय़ चालले. दहशतवाद्यांनी केलेल्या अंदाधुंद गोळीबारात २२ ओलिस ठार झाले. तर उर्वरितांची सुटका करण्यात आली. त्यात २० भारतीयांचाही समावेश आहे.
मालीची राजधानी बामाको येथील रॅडिसन ब्ल्यू या पंचतारांकित हॉटेलवर शुक्रवारी सकाळी दहशतवाद्यांनी हल्ला केला. कारमधून आलेल्या या दहशतवाद्यांनी हॉटेलमध्ये प्रवेश करताच ‘अल्लाहु अकबर’चा नारा देत अंदाधुंद गोळीबार करण्यास सुरुवात केली. यावेळी हॉटेलात १७० जण होते. त्यात ३० कर्मचाऱ्यांचा समावेश होता. या सर्वाना दहशतवाद्यांनी ओलिस ठेवले. त्यातील ज्यांना कुराणातील आयत तोंडपाठ होते, त्यांना दहशतवाद्यांनी सोडून दिले. तर दहशतवाद्यांच्या गोळीबारात १८ जण ठार झाले. दरम्यान, हल्ल्याचे वृत्त समजताच मालीच्या सुरक्षा दलांनी हॉटेलला वेढा घातला. जवानांनी हॉटेलात प्रवेश करत ओलिसांची सुटका करण्यास सुरुवात केली. त्यात २० भारतीयांचा समावेश आहे. दहशतवादी व सुरक्षा जवान यांच्यात सुमारे नऊ तास धुमश्चक्री चालली. त्यात दोन दहशतवादी ठार झाले. त्यानंतर उर्वरित ओलिसांची सुटका करण्यात आली. हॉटेलातील ओलिसांच्या सुटकेसाठी प्रयत्न करणाऱ्या माली सुरक्षा जवानांच्या मदतीसाठी फ्रान्सने तातडीने ४० जवानांचे विशेष पथक रवाना केले होते.
याआधीचे हल्ले
मालीतील सेवरे या शहरात ऑगस्टमध्ये अशाच प्रकारचा हल्ला करण्यात आला होता. त्यात संयुक्त राष्ट्रांचे पाच कर्मचारी, चार सैनिक व चार दहशतवादी ठार झाले होते. तसेच मार्चमध्येही राजधानी बामाकोतील एका रेस्टॉरंटला दहशतवाद्यांनी लक्ष्य केले होते. त्यात पाच नागरिक ठार झाले होते.
युरोपीय समुदायाच्या सर्व सीमा सीलबंद
मालीतील हल्ल्याचे वृत्त समजताच युरोपीय समुदायाच्या नेत्यांनी घाईघाईत ब्रुसेल्स येथे तातडीची बैठक बोलावून युरोपीय समुदायातील सर्व सदस्य देशांच्या सीमा सीलबंद करण्याचा निर्णय घेतला. समावेश होता. या सर्वाना दहशतवाद्यांनी ओलिस ठेवले. त्यातील ज्यांना कुराणातील आयत तोंडपाठ होते, त्यांना दहशतवाद्यांनी सोडून दिले. तर दहशतवाद्यांच्या गोळीबारात २२ जण ठार झाले.
दरम्यान, हल्ल्याचे वृत्त समजताच मालीच्या सुरक्षा दलांनी हॉटेलला वेढा घातला.
जवानांनी हॉटेलात प्रवेश करत ओलिसांची सुटका करण्यास सुरुवात केली. त्यात २० भारतीयांचा समावेश आहे. दहशतवादी व सुरक्षा जवान यांच्यात सुमारे नऊ तास धुमश्चक्री चालली. त्यात दोन दहशतवादी ठार झाले. त्यानंतर उर्वरित ओलिसांची सुटका करण्यात आली. हॉटेलातील ओलिसांच्या सुटकेसाठी प्रयत्न करणाऱ्या माली सुरक्षा जवानांच्या मदतीसाठी फ्रान्सने तातडीने ४० जवानांचे विशेष पथक रवाना केले होते.