मक्का मधील काबाच्या पवित्र मशिदीवर दहशतवादी हल्ला करण्याचा कट सुरक्षा दलांनी उधळवून लावला. सुरक्षा दलांनी मक्का मशिदीवर दहशतवादी हल्ल्याची योजना उधळवून लावल्याची माहिती शुक्रवारी सौदी अरेबियाच्या अंतर्गत मंत्र्यांनी दिली. अल अरेबिया टीव्ही आणि सौदी सरकारची अधिकृत वाहिनी अल इखबारियाने हे वृत्त दिले. संशयित आत्महघातकी हल्लेखोराने बॉम्बस्फोटाने स्वत:ला उडवून लावले. यात एका सैनिकासह ९ जण ठार झाले.

तीन दहशतवादी संघटनांनी एकत्रित येऊन हा कट रचल्याचे सौदी सरकारने सांगितले. यातील दोन दहशतवादी संघटना या मक्केतीलच आहेत. तर तिसरी संघटना ही जेद्दा येथील आहे. सौदीतील सुरक्षा दलांनी मक्कामधील असिला जिल्हा आणि अजयाद-अल-मसाफी या भागात दहशतवादविरोधात कारवाई केली. अजयाद येथील एका घरात आत्मघातकी हल्लेखोर लपले होते. त्यांनी शरण येण्यास नकार दिल्यानंतर पोलिसांनी गोळीबार सुरू केला. त्यानंतर त्या दहशतवाद्याने स्वत:ला बॉम्बने उडवून दिले. या घटनेत ६ नागरिक आणि ५ सैनिक जखमी झाले. या प्रकरणी एका महिलेसहीत ५ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

इंडिया सत्तेत आल्यास ‘सीएए’ रद्द करणार! माकपच्या टीकेवर चिदम्बरम यांचा खुलासा
police case marathi news, prithvi shaw marathi news
‘पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश द्या’, पृथ्वी शॉविरोधात गुन्हा न नोंदवल्याचे प्रकरण
attack on college girl failed after the woman started screaming
शाब्बास! महिलेच्या प्रसंगावधानामुळे तरुणीवरील हल्ल्याचा प्रयत्न फसला…
pm narendra modi rally in meerut
भ्रष्टाचाराविरुद्धचा लढा थांबणार नाही! मेरठच्या सभेत पंतप्रधानांचा इंडिया आघाडीला इशारा

मक्का येथाील ग्रँड मशीद ही जगातील सर्वांत मोठी मशीद आहे. रमजान महिन्यातील काल शेवटचा शुक्रवार होता. ईदची नमाज पठण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात जगातील विविध भागातून मुसलमान मक्का येथे येतात.

या ऑपरेशनचे अनेक दृष्ये लोकांनी सोशल मीडियावर शेअर केले आहे. यातील अनेक छायाचित्रे हे स्फोटानंतरची आहेत. यापूर्वी शुक्रवारी सकाळी सुरक्षादलाबरोबर झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला होता. या संशयित दहशतवाद्याच्या अनेक साथीदारांना मक्कातील एका भागातून अटक करण्यात आली आहे. आयसिसने सौदी अरेबियाला धमकी दिल्याचे वृत्तही येत आहे.