भारतीय जनता पक्षाच्या(भाजप) निर्णयप्रक्रियेवर संघाचा प्रभाव असल्याचे सत्य पक्षाच्या नेत्यांकडून कितीही नाकारले जात असले तरी संघाची भाजपवर पकड असल्याचे अनेकदा निदर्शनास आले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील अनेक कार्यकर्ते आज भाजपमध्ये मोक्याच्या ठिकाणी विराजमान झालेले दिसतात. नरेंद्र मोदी केंद्रात सत्तेत आल्यापासून तर हे अधिक प्रकर्षाने जाणवू आणि दिसू लागले आहे. त्यानिमित्ताने भाजपचे संघाशी असलेले ऋणानुबंध किती घट्ट आहेत, याचा घेतलेला आढावा.

संघ आणि भाजप
संघाचे प्रचारक म्हणून ओळखले जाणारे सदस्य संघटनेचे आजीवन सदस्य असतात. संघटनेच्या कामात वाहून घेतल्यामुळे बहुतांश प्रचारक लग्नासारख्या वैयक्तिक जबाबदाऱ्यांपासून स्वत:ला दूर ठेवणे पसंत करतात. संघ किंवा अन्य संघटनेमधील प्रचारकांना भाजप पक्षात सक्रिय केले जाते, तेव्हा त्यांना संघटन मंत्रीपदाचा(सचिव) दर्जा देण्यात येतो. आजच्या घडीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी १००हून अधिक संघटना संलग्न आहेत. मात्र, भाजपमध्ये सक्रिय असलेले बहुतांश प्रचारक हे संघ किंवा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतून (अभविप) आलेले आहेत.

modi39
नरेंद्र मोदी
राष्ट्रीय पातळीवर सचिवपदाचा कार्यभार सांभाळलेल्या नरेंद्र मोदींना १९९० साली भाजपमध्ये पाठवण्यात आले. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी वर्णी लागण्यापूर्वी मोदींनी पंजाब, हिमाचल, जम्मू-काश्मिर आणि हरियाणा येथे संघाचे राष्ट्रीय सचिव म्हणून काम केले होते.

solanki-embedकप्तान सिंग सोलंकी
संघाचे प्रचारक असूनही विवाहित असलेले कप्तान सिंग सोलंकी भाजपमध्ये सक्रिय होण्यापूर्वी मध्य प्रदेशात प्रांत प्रचारक म्हणून कार्यरत होते. नरेंद्र मोदी सत्तेत आल्यानंतर त्यांच्यावर हरियाणाच्या राज्यपालपदाची जबाबदारी सोपाविण्यात आली आहे.

khattar-lमनोहरलाल खट्टर
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अंत्योद्य शाखेचा राष्ट्रीय पातळीवरील कार्यभार सांभाळणारे मनोहरलाल खट्टर यांचे नाव गेल्या काही दिवसांपासून हरियाणाच्या मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत आहे. खट्टर यांनी गुजरातसह अनेक राज्यांमध्ये संघाच्या माध्यमातून काम केले आहे.

ramramसध्या भाजप पक्षात संघाचे ३० प्रचारक कार्यरत आहेत. यापैकी रामलाल आणि शिवप्रकाश या दोघांनी बिहारच्या पश्चिम भागात क्षेत्र प्रचारक म्हणून काम केले आहे. रामलाल आणि व्ही.सतीश यांनी अभविपच्या माध्यमातून संघासाठी काम केले आहे.

राष्ट्रीय पातळीवर कार्यरत असलेले प्रचारक
हद्यनाथ सिंग- किसान मोर्चा आणि पंचायत राज
माखन सिंग हे ज्येष्ठांसाठी चालविण्यात येणाऱ्या सहयोग शाखेचे काम पाहतात
भागवत शरण माथूर हे मागासवर्गीयांसाठी चालविण्यात येणाऱ्या शाखेचे काम पाहतात
राम प्यारे पांडे- प्रशिक्षण शाखा
राकेश जैन- प्रशिक्षण शाखा
व्ही. शण्मुगनाथन- संघटक