वर्णविद्वेषी गुन्हय़ांच्या निषेधार्थ भारतीय अमेरिकी लोकांनी व्हाइट हाऊसपुढे निदर्शने केली, या प्रकरणी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हस्तक्षेप करावा, अशी मागणी या वेळी निदर्शकांनी केली असून, देशात वर्णविद्वेषी गुन्हे वाढल्याचे म्हटले आहे. या निदर्शनांमध्ये शीख व िहदू लोकांचा मोठय़ा प्रमाणात समावेश होता. व्हर्जिनिया येथील कॉर्पोरेट वकील िवध्या अडापा यांनी सांगितले, की िहदूंना अलीकडेच मोठा फटका बसला आहे. इस्लामभय व स्थलांतरित विरोधी मोहिमेमुळे समाजाला वर्णविद्वेषी गुन्हय़ांना सामोरे जावे लागत आहे. अडापा यांनी काही भारतीय अमेरिकी व्यक्तींसह या प्रकरणी जागरूकता निर्माण करण्यासाठी निदर्शन आंदोलन केले. कन्सास येथे माहिती तंत्रज्ञान अभियंत्याचा खून हा तो अरब किंवा मुस्लिम आहे असे समजून करण्यात आला व आताच्या वातावरणात िहदू अमेरिकनांसह सर्वच समुदायांना लक्ष्य केले जात आहे, असे भारतीय अमेरिकी डॉक्टर शेषाद्री यांनी सांगितले. वर्णविद्वेषी गुन्हय़ांचे गांभीर्य लक्षात घेऊन अध्यक्ष ट्रम्प यांनी हस्तक्षेप करावा. स्थलातंरित विरोधी धोरण व इस्लामभयातून या घटना होत आहेत. िहदू लोक हे मुस्लिम असल्याचा समज होऊन त्यांना लक्ष्य केले जात आहे. यावर विविध समुदायांतही जागृती घडवण्याची गरज आहे, असे अडापा यांनी सांगितले. अध्यक्ष ट्रम्प यांना सादर केलेल्या निवेदनात कोअलिशन ऑफ इंडियन अमेरिकन ऑर्गनायझेशन्स या संघटनेने म्हटले आहे, की वर्णविद्वेषी घटनांतील गुन्हेगारांवर संघराज्य कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात यावी. भारतीय अमेरिकी लोकांमध्ये विश्वासाचे वातावरण तयार करून काही सुधारणात्मक उपाययोजना कराव्यात अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. कुठल्याही नागरिकाने कायदा हातात घेतल्यास त्यांना कठोर शिक्षा होईल, असा संदेश ट्रम्प प्रशासनाने कृतीतून देण्याची गरज प्रतिपादन करण्यात आली आहे. भारतीय अमेरिकी व्यक्तींच्या विरोधात अनेक गुन्हे वर्णविद्वेषातून व स्थलांतरित विरोधी धोरणामुळे घडले असून त्या पाश्र्वभूमीवर ही निदर्शने करण्यात आली.