व्हाइट हाऊसने अनौपचारिक (ऑफ कॅमेरा) घडामोडींच्या वार्ताकनास काही प्रमुख वृत्तपत्रे, वाहिन्या व वृत्तसंस्था यांना बंदी घातली असून त्यात बीबीसी, दि न्यूयॉर्क टाइम्स, सीएनएन यांचा समावेश आहे.

ट्रम्प प्रशासन व प्रसारमाध्यमे यांच्यातील तणाव टोकाला गेला असून हा निर्णय अभूतपूर्व मानला जात आहे. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉन्झर्वेटिव्ह पॉलिटिकल अ‍ॅक्शन कॉन्फरन्सच्या वार्षिक कार्यक्रमात प्रसारमाध्यमांवर तोंडसुख घेतले होते व प्रसारमाध्यमेच अमेरिकी जनतेची खरी शत्रू असल्याचा आरोप केला होता. व्हाइट हाऊसने काल अगदी निवडक गटांच्या पत्रकारांना बोलावले होते. त्यात दि न्यूयॉर्क टाइम्स, द लॉसएंजल्स टाइम्स, पॉलिटिको, बझफीड, दि बीबीसी, दि गार्डियन यांना मनाई करण्यात आली.

व्हाइट हाऊसचे प्रसिद्धी सचिव सीन स्पायसर यांच्या कार्यालयात हा कार्यक्रम झाला. अनौपचारिक पत्रकार परिषद नेहमीच्या प्रश्नोत्तरांऐवजी व्हाइट हाऊसच्या ब्रीफिंग रूममध्ये घेण्यात आली. प्रतिबंधित वृत्तपत्रे व वाहिन्यांच्या प्रतिनिधींनी या कार्यक्रमाच्या ठिकाणी प्रवेश करण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा समावेश निमंत्रितात नाही असे सांगून त्यांना बाहेर घालवण्यात आले.

या बंदी हुकमाचे समर्थन करताना ट्रम्प प्रशासनाच्या प्रवक्त्या सारा सँडर्स यांनी सांगितले, की प्रसारमाध्यमांना प्रवेश नाकारण्याचा हा प्रकार आहे हा आरोप आम्ही फेटाळत आहोत. व्हाइट हाऊसची एक वेगळी व्यवस्था आहे, त्यातून सर्वाना अद्ययावत माहिती मिळेल. प्रत्येकाला संधी मिळावी म्हणून आम्ही नवीन योजना राबवली. काही जास्त प्रतिनिधींना सामावून घेतले यापलीकडे काही केलेले नाही. स्पायसर यांनी सांगितले, की ट्रम्प प्रशासन प्रसारमाध्यमातील चुकीच्या बातम्यांचा आक्रमक प्रतिकार करील, चुकीच्या बातम्या आम्ही सहन करणार नाही. मी प्रसारमाध्यम स्वातंत्र्याच्या विरोधात नाही तर चुकीच्या बातम्यांविरोधात आहे, असे ट्रम्प यांनी त्याआधी एका कार्यक्रमात सांगितले. खरोखर काही तथ्य असेल तर वाईट बातम्याही मला आवडतात. पण हो, चांगल्या बातम्यांवर माझे प्रेम आहे, मला चांगल्या बातम्या फार दिसत नाहीत. मी खोटय़ा बातम्यांविरोधात आहे, असे ट्रम्प यांनी सांगितले.

 

आथक वाढीस प्रतिकूल र्निबध हटवण्याचे ट्रम्प यांचे आदेश

पीटीआय : प्रशासनाच्या विविध विभागातील रोजगारनिर्मितीच्या आड येणारे र्निबध दूर करण्याचा मार्ग मोकळा करणाऱ्या आदेशावर अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वाक्षरी केली असून त्यामुळे तेथील स्थानिक लोकांसाठी आíथक संधीही वाढणार आहेत.

ट्रम्प यांनी सांगितले, की मी अलीकडेच ज्या आदेशावर स्वाक्षरी केली आहे, त्यामुळे प्रत्येक संस्थेला नियमनात्मक सुधारणा कामगिरी गट स्थापन करावा लागणार आहे. त्यात अर्थकारण व रोजगारनिर्मितीत असलेले अनावश्यक र्निबध काढून टाकण्याचे काम केले जाईल. जास्तीत जास्त रोजगार तयार करतानाच उद्योगांना अनुकूल वातावरण तयार करणे हा या आदेशाचा हेतू आहे. यातील प्रत्येक गट सध्याचे कुठले र्निबध सुलभ करता येतील किंवा रद्द करता येतील याबाबत शिफारशी करणार आहे. कंपन्यांनी रोजगार वाढवावेत व उद्योगास अनुकूल वातावरण असावे. कंपन्यांनी रोजगारनिर्मितीतील अडथळे दूर करावेत अशी माझी अपेक्षा आहे, अशी अपेक्षा ट्रम्प यांनी व्यक्त केली आहे. अमेरिकेला उद्योगस्नेही देश बनवण्यासाठी त्यांनी अनेक आदेशांवर स्वाक्षऱ्या केल्या असून त्यात या आदेशाचा समावेश आहे. रोजगारनिर्मिती व आíथक संधीतील र्निबध हटवल्यानंतर खरे परिणाम सामोरे येतील असे ते म्हणाले. प्रत्येकी एका नवीन नियमामागे आधीचे दोन र्निबधात्मक नियम रद्द करण्यात यावेत, असा आदेश त्यांनी आधीच जारी केला आहे. कुठलाही र्निबध जीवन सुखकर करणारा, आíथक स्थिती सुधारणारा,, रोजगारवर्धक आहे की नाही या चाचणीवर पारखला जाईल. अमेरिकी ग्राहक व कर्मचारी यांना तो योग्य आहे का याची चाचपणी केली जाईल. जर तो नियम किंवा र्निबध या गोष्टींना मारक असेल, तर तो ताबडतोब रद्द केला जाईल. अमेरिकेत उद्योगधंदा करणाऱ्या कंपन्यांना यापुढे कुठलीही शिक्षा होणार नाही व अडचणींना सामोरे जावे लागणार नाही, असे ट्रम्प यांनी सांगितले आहे. नियम व र्निबधाचे ओझे काढून टाकून कोळसा खाणचालक तेथील कामगार, कारखान्यातील कामगार, छोटय़ा उद्योगांचे मालक व इतरांना उद्योगवाढीची पुरेशी संधी आता मिळेल. कुणाच्याही संधीमध्ये सरकार अडथळा बनणार नाही, आम्ही रोजगार परत आणून व नवीन संधी निर्माण करून देशाची पूर्वीपेक्षा जास्त भरभराट करू, अशी ग्वाही त्यांनी दिली.