दिवसातून तीनवेळा चहा प्यायल्याने बुद्धी तल्लख राहते आणि म्हातारपणात होऊ शकणारा स्मृतिभ्रंशाचा धोकाही टाळता येतो… हा निष्कर्ष आहे काही शास्त्रज्ञांचा. कॅलिफोर्निया विद्यापीठातील सहा संशोधकांनी केलेल्या संशोधनानुसार शास्त्रज्ञांनी हा निष्कर्ष काढला.
चहामध्ये असलेल्या थिअनाइन घटकामुळे स्मृतिभ्रंशाचा धोका टाळला जाऊ शकतो, असा शास्त्रज्ञांचा दावा आहे. दिवसातून एक ते तीन वेळा चहा प्यायल्याने महिलांमधील मानसिक तणाव कमी होऊ शकतो.
डेली मेलने दिलेल्या एका वृत्तानुसार, सिंगापूरमध्ये दिवसातून चारपेक्षा जास्त कप चहा घेणाऱया सुमारे १५०० पुरूष आणि महिलांचा अभ्यास करण्यात आला. वाढत्या वयानुसार त्यांच्या स्मरणशक्ती कमी होण्याचे प्रमाण घटल्याचे दिसून आले.
केवळ चहा आणि मशरुममध्येच थिअनाइन हा घटक असतो. स्मृतिभ्रंश होतानासाठी मानवी मेंदूमध्ये तयार होणारे घटक आटोक्यात ठेवण्यास थिअनाइन मदत करीत असतो. चहा आणि कॉफीचा स्मरणशक्ती आणि मेंदूचा तल्लखपणा याच्याशी असलेला संबंध शोधून काढण्यासाठी विविध संशोधने अमेरिकेत करण्यात आली. त्यामध्ये चहाचा स्मरणशक्ती कायम ठेवण्यासाठी उपयोग होत असल्याचे दिसून आले आहे.