पूर्व अफगाणिस्तानात व्हॉलिबॉल सामन्याच्या वेळी रविवारी झालेल्या स्फोटात ५७ जण ठार झाले असून, प्रेक्षक सामन्याच्या अंतिम क्षणांचा आनंद लुटत असतानाच हा स्फोट झाला होता. २०११ नंतर प्रथमच अफगाणिस्तानात इतका भयानक स्फोट झाला असून तीन संघांचे अनेक तरूण खेळाडू पकटिका प्रांतात झालेल्या स्पर्धेच्यावेळी उपस्थित होते. आणखी १५ जणांचा रात्री मृत्यू झाला. दोन जवान सकाळी मरण पावले.
हल्ल्यातील जखमी असलेले नाटोचे दोन सैनिक सोमवारी सकाळी मरण पावले आहेत.  अंतर्गत सुरक्षा मंत्रालयाचे नजीब दानिश यांनी सांगितले की, चार स्थानिक पोलिस यात ठार झाले. अफगाणिस्तानचे अध्यक्ष अशरफ घनी यांच्यापुढे, अमेरिकी सैन्य माघारी गेल्यानंतर किती मोठी आव्हाने आहेत याचे दर्शन या स्फोटातून घडून आले आहे. महंमद रसूल याने सांगितले की, अनेक लोक रक्ताच्या थारोळ्यात पडले होते, अनेक तरूण माणसे जखमी झाली होती. त्यांना बँडेजेस लावली होती.
ॉक्टर सेयावश यांनी सांगितले की, आमच्या रूग्णालयात १२ जणांची स्थिती गंभीर आहे. कारण त्यांना बॉल बेअरिंगमुळे जखमा झाल्या आहेत. तालिबानने यावर प्रतिक्रिया दिलेली नाही. जास्त प्राणहानी झाली की ते हल्ल्याची जबाबदारी घेण्याचे टाळतात असा आजवरचा अनुभव आहे.