पश्चिम घाटात गाणाऱ्या अनेक पक्ष्यांच्या प्रजाती गेल्या काही वर्षांत तयार झाल्या आहेत, शिवाय त्यांनी गेल्या १० हजार वर्षांत स्थलांतर केलेले नाही. स्काय आयलंड व इतर खोऱ्यांमध्ये गाणाऱ्या या पक्ष्यांच्या नवीन प्रजाती सापडल्या आहेत, असे एका अभ्यासात म्हटले आहे.
मोटांना क्लाऊड म्हणजे मोंटानाच्या जंगलात गाणाऱ्या पक्ष्यांच्या नवीन २३ प्रजाती सापडल्या आहेत. पालाघाट खोऱ्यातून गेली हजारो वर्षे या पक्ष्यांच्या प्रजाती तेथेच आहेत, काही पक्षी तेथे लाखो वर्षांपासून आहेत. त्यातील दोन प्रजातीत उत्क्रांती झाल्याचे दिसून आले आहे.
बंगळुरू येथील नॅशनल सेंटर फॉर बायॉलॉजिकल सायन्सेस या संस्थेचे संशोधक व्ही.व्ही.रॉबिन यांनी सांगितले की, पक्ष्यांमध्ये ही उत्क्रांती कशी घडून आली याचा अभ्यास केला असता या नव्या प्रजाती असून त्या जनुकीय नष्टचर्याच्या मार्गावर आहेत.
या संस्थेच्या वैज्ञानिकांनी त्यांच्या अभ्यासासाठी तीन वर्षांत ३५० पक्ष्यांची जनुकीय माहिती गोळा केली होती. त्यात त्यांना आखूड पंखांच्या पक्ष्यांची नवी प्रजात सापडली आहे. तसेच, लाफिंग थ्रस्ट बर्ड म्हणजे ‘हसणारा पक्षी’ ही एक नवीन प्रजात सापडली आहेत.
या खोऱ्याच्या दोन भागात जनुकीय विविधता अधिक आहे व पक्ष्यांच्या नवीन प्रजाती आहेत. पक्ष्याचा आवाज, जनुकीय विविधता, आकार, रंग यावरून आंतरराष्ट्रीय पक्षितज्ज्ञांनी हा अभ्यास केला आहे. हे ठिकाण समुद्र सपाटीपासून १४ हजार मीटर उंच असून पश्चिम घाटातील स्कायलँडचा त्यात समावेश होतो. येथे पक्ष्यांच्या २३ प्रजाती अशा आहेत की, ज्यांचा अधिवास एकच आहे. स्काय आयलंड ७०० कि.मी भागात पसरलेले असून त्याच्यामध्येच एक खोल खोरे आहे, तेथे या पक्ष्यांचा अधिवास आहे.
पक्ष्यांच्या दोन प्रजाती तेथे ६.७८ दशलक्ष वर्षांपासून आहेत व आमच्या अभ्यासानुसार डोंगराळ भाग व खोरे यातील हवामानामुळे पक्ष्यांचा अधिवास बदलत जातो. पालघाट हे मोठे खोरे असले तरी शेनकोटाह व छायलिया खोऱ्यात काही प्रजातींवर परिणाम झाला आहे. डोंगराळ भागातील पक्षी शोधल्याने पक्ष्यांचा एक मोठा समूह तयार होणार आहे, असे संशोधक उमा रामकृष्णन यांनी सांगितले. ‘प्रोसिडिंग ऑफ रॉयल सोसायटी’ या नियतकालिकात हा शोधनिबंध प्रसिद्ध झाला आहे.