‘ट्विटर’ या मायक्रोब्लॉगिंग संकेतस्थळाने त्याचे रूपडे बदलून ते फेसबुकसारखे केले आहे.  
नवीन वेब प्रोफाइलमध्ये मोठा फोटो, विशिष्ट हेडर, तुमचे चांगले ट्विट वेगळे दाखवणे या सुविधा आहेत, असे डेव्हिड बेलोना यांनी सांगितले.
अमेरिकेच्या प्रथम नागरिक  मिशेल ओबामा यांच्या ट्विटर खात्यात हे बदल दिसले आहेत व संगीतकार जॉन लिजंड यांच्या ट्विटर पेजमध्येही बदल दिसले आहेत. ट्विटरच्या पेजेसची नवीन रचना अशी आहे की, लोक रिट्विट करण्याच्या मोहात पडतील. जो ट्विट आवडेल तो वेगळा काढून ठेवता येईल. तुमची माहिती तुमच्या ट्विटर अनुसरकांना (फॉलोअर्स) दिसेल. हे बदल लवकरच प्रत्येकाच्या ट्विटर खात्यात दिसतील. गेल्या वर्षअखेरीची आकडेवारी बघता अमेरिकेत दर सहा लोकांपैकी एक जण ट्विटर वापरतो व ब्रिटनमध्ये इंटरनेट वापरणाऱ्यांपैकी एक तृतीयांश लोक ट्विटर वापरतात.