जम्मू-काश्मीर भारताचा अविभाज्य भाग असल्याचे ठणकावून सांगितल्यानंतर ट्विरकरांनी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांना आयर्न लेडी म्हणून संबोधले आहे. संयुक्त राष्ट्र आमसभेत सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्याकडून काश्मीरबाबत करण्यात आलेल्या वक्तव्यांना सडेतोड उत्तर दिले. ‘काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांच्या घरावर दगड मारायचे नसतात,’ या त्यांच्या वाक्याने सभागृहातही टाळ्यांचा कडकडाट झाला. सुषमा स्वराज यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेत सोमवारी दुसऱ्यांदा संबोधित करत होत्या. यापुर्वी त्यांनी पहिल्या आंतरराष्ट्रीय योग दिनादिवशी संयुक्त राष्ट्रसंघातील सदस्यांना संबोधित केले होते. विशेष म्हणजे त्यांनी आजचे भाषण हिंदीमध्ये केले.
पाकिस्तानला संदेश पोहचविण्यासाठी सुषमा यांनी हिंदीमध्ये भाषण केल्याची प्रतिक्रिया एका नेटीझमने दिली आहे. तर सुषमानी शरीफांची धुलाई केली. अशा प्रतिक्रियाही ट्विटरवर पहायला मिळत आहेत.दहशतवादाची निर्मिती करणाऱ्या, दहशतवाद पोसणाऱ्या, दहशतवादी निर्यात करणाऱ्या देशांना आंतरराष्ट्रीय समुहाने एकटे पाडले पाहिजे.असे सुषमा यांनी म्हटले होते. तसेच पाकिस्तान विरोधात भारताकडे जीवंत पुरावा असल्याचे सांगत पाकिस्तानला त्यांनी खडे बोल सुनावले होते.त्यांच्या या भाष्यासाठी काही नेटीझम्सनीं त्यांना’आयर्न लेडी’ची उपमा दिली आहे.