अल्फा सेंटॉरी या आपल्या सौरमालेतील जवळच्या ताऱ्याभोवती दोन नवे ग्रह सापडले असून ते पृथ्वीसारखे असण्याची शक्यता आहे. पृथ्वीसदृश ग्रह असले तरी ते मातृताऱ्यापासून जवळ आहेत हे त्यांचे वैशिष्टय़ आहे. अल्फा सेंटॉरी हा द्वैती तारा असून तो आपल्या सौरप्रणाली पासून ४.३ प्रकाशवर्षे दूर आहे. २०१२ मध्ये खगोलशास्त्रज्ञांनी असे जाहीर केले होते की, अल्फा सेंटॉरी मालिकेत ग्रह आहे त्याचे नाव अल्फा सेंटॉरी-बीबी असे आहे. तो लहान ताऱ्यांभोवती फिरत आहे.
अल्फा सेंटॉरी बी यासारख्या ताऱ्यांभोवती ते ग्रह फिरत आहेत तथापि २०१३ मध्ये इतर संशोधकांनी असे सांगितले की, अल्फा सेंटॉरी-बीबी असा ग्रह अस्तित्वात असण्याची शक्यता कमी आहे. कारण त्याचे पुरेसे पुरावे नाहीत.
केंब्रिज विद्यापीठाचे ब्राइस- ऑलिव्हर डेमरी व त्यांच्या सहकाऱ्यांनी हबल दुर्बीणीचा वापर करून हे ग्रह प्रत्यक्षात असल्याचे दाखवून दिले आहे. त्यांनी हे ग्रह पाहिलेले नसले तरी ते पृथ्वीच्या आकाराचे ग्रह आहेत, असे न्यू सायंटिस्टने म्हटले आहे.
अल्फा सेंटॉरी बी हा २०१३-१४ मध्ये सापडला होता व त्याचे चाळीस तास निरीक्षण करण्यात आले. २०१३ च्या माहितीनुसार या ग्रहांच्या कक्षा अपेक्षेपेक्षा मोठय़ा आहेत. त्यामुळे अल्फा सेंटॉरी-बीबी हा ग्रह तेथे नाही असा अर्थ काढता येणार नाही. जर तो असेल तर पृथ्वीवरून जशा प्रतियुती दिसतात तसे निरीक्षण त्याच्याबाबत शक्य नाही. हबल दुर्बीणीच्या निरीक्षणानुसार हे दोन ग्रह म्हणजे ताऱ्यावरीलच दोन ठिपके असू शकतात हा दावा फेटाळण्यात आला आहे. पृथ्वीसदृश ग्रहांची निरीक्षण केंद्रांनी केलेल्या अंदाजानुसार तेथील वर्ष हे २०.४ दिवसांचे आहे, ते जरा अंदाजापेक्षा जास्त असून हा ग्रह ताऱ्याच्या जवळ असल्याने हा परिणाम दिसून येत आहे.

*  ग्रहाचे नाव- अल्फा सेंटॉरी-बीबी
* मातृताऱ्याचे नाव-अल्फा सेंटॉरी
*  ताऱ्याचे सौर प्रणालीपासून अंतर ४.३ प्रकाशवर्षे
* ग्रहावरील वर्षकाल- २०.४ दिवस