26 April 2017

News Flash

काश्मीरमध्ये अफजलच्या फाशीविरोधात निदर्शने करणारे दोघे जखमी

संसदेवरील हल्ल्यातील दोषी आणि जैश ए मोहम्मद दहशतवादी संघटनेचा म्होरक्या अफजल गुरुला फाशी दिल्यानंतर

श्रीनगर | Updated: February 9, 2013 3:58 AM

संसदेवरील हल्ल्यातील दोषी आणि जैश ए मोहम्मद दहशतवादी संघटनेचा म्होरक्या अफजल गुरुला फाशी दिल्यानंतर त्याची संतप्त प्रतिक्रिया काश्मीरमध्ये काही भागात उमटली. बारामुल्ला जिल्ह्यात पोलिसांनी केलेल्या कारवाईत दोन जण जखमी झाले. 
अफजलला फाशी दिल्यानंतर तातडीने काश्मीर खोऱयात संचारबंदी लागू करण्यात आली. बारामुल्ला जिल्ह्यातील काही भागात अफजलच्या समर्थनार्थ काही लोक निदर्शने करू लागली. पोलिसांनी निदर्शकांच्या दिशने अश्रूधुराच्या नळकांडी फोडल्यानंतर त्यातील पत्रा लागल्यामुळे बिलाल अहमद गोजरी जखमी झाला. सोपोर भागामध्ये पोलिसांनी केलेल्या गोळीबारात फिरदोस अहमद जखमी झाला. अफजल गुरु याच भागात राहात होता.
दोन्ही जखमी व्यक्तींना रुग्णालयात नेण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

First Published on February 9, 2013 3:58 am

Web Title: two injured in protests in kashmir
  1. No Comments.