ब्रिटनमध्ये मँचेस्टर येथील बॉम्बहल्ल्यात १९ ठार, तर ५० जण जखमी झाल्याच्या दहशतवादाशी संबंधित घटनेचा राष्ट्रपती प्रणव मुखर्जी व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निषेध केला आहे. त्यांनी ट्विटरवर म्हटले आहे, की मँचेस्टरमधील हल्ल्याने वाईट वाटले. आम्ही या हल्ल्याचा जोरदार निषेध करतो. मृतांचे नातेवाईक व जखमी यांच्याबाबत आम्ही सहवेदना व्यक्त करतो. अमेरिकेची पॉपस्टार अरियाना ग्रँड हिचा मँचेस्टर शहरात कार्यक्रम सुरू असताना हल्लेखोराने बॉम्बस्फोट घडवून आणले. यात पॉपस्टार ग्रँड वाचली आहे. प्रत्यक्ष घटना पाहणाऱ्यांनी सांगितले, की या वेळी घटनास्थळी मोठा आवाज झाला. अमेरिकी पॉपस्टार अरियाना ग्रँडचा कार्यक्रम सुरू असताना हा प्रकार घडला. या घटनेची व्हिडिओ चित्रफीत मिळाली असून, त्यात रक्ताने माखलेले लोक दिसत होते. त्यांना आपत्कालीन सेवेने मदत केली जात आहे. मफल कार्यक्रमाच्या ठिकाणी तिकीटबारी सुरू असताना स्फोट झाले. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी सांगितले, की मँचेस्टर येथील हल्ल्याच्या वृत्ताने धक्काच बसला. या अवघड प्रसंगात भारतीय नागरिक ब्रिटनमधील दहशतवादग्रस्त लोकांच्या पाठीशी आहेत.