ऐतिहासिक लाल किल्ल्यावर सेल्फी काढणे  युक्रेनचे राजदूत इगोर पोलिका यांना  महागात पडले आहे. एका चोराने त्यांचा मोबाईलच लंपास केला. या प्रकरणी त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी पोलिका लाल किल्ल्यासमोर उभे राहून सेल्फी काढत होते. पोलिका एकटेच होते. त्याचवेळी एक अनोळखी व्यक्ती त्यांच्याजवळ आली. काही कळायच्या आत त्या व्यक्तीने पोलिका त्यांचा मोबाईल लंपास केला आणि तिथून पळ काढला.

पोलीस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, आरोपींविषयी माहिती मिळाली आहे. काही पुरावे हाती लागले आहेत. ते या भागातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करीत आहेत. या प्रकरणी पोलीसांनी १०० हून अधिक लोकांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी करण्यात येत आहे.

पोलिका यांना फोटोग्राफीची आवड आहे. त्यांच्या फोनमध्ये भारतातील विविध ठिकाणी काढलेले काही फोटो आणि वैयक्तिक माहिती आहे. या माहितीचा गैरवापर होऊ शकतो. तो टाळण्यासाठी मोबाईल मिळावा, असे त्यांनी सांगितले.