भारतासारख्या अनेकतत्त्ववाद आणि विविधता असलेल्या देशात समान नागरी कायदा होऊच शकत नाही, असे एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी म्हटले आहे.

हिंदू अविभक्त कुटुंबाला ज्या करसवलती मिळत आहेत त्या सोडून देण्याची संघ परिवाराची तयारी आहे का, असा सवाल हैदराबादचे लोकसभा खासदार ओवेसी यांनी केला. आपल्या पक्षाची समान नागरी कायद्यावर चर्चेची तयारी आहे का, असा सवाल ओवेसी यांना विचारण्यात आला होता.

आपल्या घटनेत १६ मार्गदर्शक तत्त्वे असून त्यांपैकी एक संपूर्ण दारूबंदीबाबतचे आहे, आपण त्याबाबत का बोलत नाही आणि भारतात संपूर्ण दारूबंदी का करीत नाही, असा सवाल त्यांनी केला. दारूडय़ा पतीकडून अनेक महिलांचा छळ होतो,  दारूमुळे रस्त्यावरील अपघातांमध्ये वाढ होते, अशी आकडेवारी आहे, असे असताना देशात संपूर्ण दारूबंदी का नाही, असा सवालही त्यांनी केला.