वैज्ञानिकांनी फ्लूवर सामायिक अशी लस तयार केली असून ती विषाणूंच्या अनेक प्रकारांना प्रतिबंध करण्यात उपयुक्त ठरू शकते, असा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे लाखो लोकांच्या बळी घेणाऱ्या फ्लूच्या साथी टळू शकतील असा दावा वैज्ञानिकांनी केला आहे. संशोधकांनी दोन प्रकारच्या सामायिक लसी तयार केल्या असून त्यातील एक फ्लूच्या ८८ टक्के विषाणूंवर लागू पडते. त्या लशीचा एक डोसही यात पुरेसा पडतो. ही लस हिवाळ्याच्या शेवटी घेतली तर त्याचा फायदा होतो.

दुसरी जी लस तयार करण्यात आली आहे ती अमेरिकेतील इन्फ्लुएंझाच्या ९५ टक्के विषाणूंवर लागू ठरणारी आहे. दरवर्षी फ्लूचे लसीकरण केले तर पुढील वर्षीपर्यंत त्यावर नियंत्रण मिळवता येऊ शकेल, असा त्यांचा दावा आहे. फ्लूच्या लशीची ही पद्धत सुरक्षित असून ती अनेकवेळा उपयोगी सिद्ध होत आहे. २०१४-१५ मध्ये एच ३ एन २ लस मात्र फ्लूवर अपयशी ठरली होती. ती फार खर्चिक व उत्पादनास कठीण आहे असे लँकेस्टर विद्यापीठाचे डरेके गॅदरर यांनी सांगितले. या वार्षिक लशी सर्वच फ्लूवर उपयोगी ठरू शकतील अशातला भाग नाही. १९१८ मध्ये स्पेनमध्ये फ्लूची साथ आली होती, त्यानंतर १९५७ व १९६८ अशा दोन वेळा त्या साथींमध्ये लाखो लोक मरण पावले होते. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते फ्लूच्या साथी या जगात वार्षिक किमान पाच लाख बळी घेत असतात. आमच्या मते व्हॅक्सिनची रचना करण्यासाठी आपण संगणकाचा वापर करू शकतो. लशीत कोणते घटक असावेत हे त्यात ठरवता येते.

आतापर्यंत एपिटोपस नावाच्या विषाणूंचा प्रकार त्यात समाविष्ट करण्यात आला नव्हता, पण हा विषाणूसुध्दा बऱ्याच लोकांमध्ये पोहोचला आहे, असे स्पेनच्या कॉम्प्लुटेन्स विद्यापीठाचे प्रेडो रीची यांनी सांगितले. एपिटोप ही लस नवीन नाही पण त्यात प्रायोगिक आधार पुरेसे नाहीत, पण आता पूर्वी तपासण्यात आलेल्या एपिटोपसचा वापर आम्ही केला आहे, असे ब्रिटनच्या अॅशटन विद्यापीठाचे डॅरेन फ्लॉवर यांनी सांगितले.