व्हर्जििनया येथे एका व्यावसायिक प्रक्षेपण तळावर अंटारेस अग्निबाण उड्डाणानंतर स्फोट होऊन कोसळला. मंगळवारी घडलेल्या या घटनेत नासाच्या खासगी प्रक्षेपकाला प्रथमच अपघातास सामोरे जावे लागले. या अग्निबाणाच्या मदतीने आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकास आवश्यक वस्तू पाठवण्यात येणार होत्या. चौदा मजल्यांचा हा अग्निबाण ऑरबायटल सायन्सेस कार्पोरेशनने वॅलॉप्स उड्डाण तळावरून सायंकाळी ६.२२ वाजता सोडला होता. त्यात सिग्नस मालवाहू अवकाशयान होते. उड्डाणानंतर आगीचा लोळ उठून ते खाली कोसळले. ऑरबायटल सायन्सेस या कंपनीचा शेअर या बातमीनंतर १२.७ टक्क्यांनी कोसळला. या अपघाताचे कारण समजू शकले नाही असे नासाचे विश्लेषक डॅन ह्युओट यांनी सांगितले. या ठिकाणी माणसांची उपस्थिती नव्हती. या वेळी काटरेग्राफिक सामग्री अवकाशयानातून पाठवण्यात येत होती, त्यामुळे आता ढिगारा सुरक्षित ठेवून ती सामग्री शोधण्याचा प्रयत्न केला जाईल, असे कंपनीचे अंटारेस प्रकल्प व्यवस्थापक माइक िपकस्टन यांनी सांगितले.नासाच्या उड्डाण नियंत्रण कक्षाने सांगितले, की प्रक्षेपण तळाचे व अग्निबाणाचे कमी नुकसान झाले आहे. अंटारेस अग्निबाणाने यापूर्वी चार यशस्वी उड्डाणे केली होती. ऑरबायटल सायन्सेसचे कार्यकारी उपाध्यक्ष फ्रँक कुलबर्टसन यांनी उड्डाणापूर्वी सांगितले, की अतिशय परिश्रमपूर्वक आम्ही उड्डाणास सज्जता प्राप्त केली आहे.